प्रहारच्या छ. संभाजीनगरातील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली; बच्‍चू कडू म्‍हणाले, मोर्चा काढणारच, कोण अडवतं ते बघू…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रहारच्या ९ ऑगस्टच्या मोर्चाला शहर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जमणारच. लाखोंच्या उपस्थितीत मोर्चा काढणारच, आम्हाला कोण अडवते ते बघू, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला आहे. स्वतः कडून यांनी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं सांगून राज्यभरातील शेतकरी, कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरात जमण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी, दिव्यांगांच्या […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रहारच्या ९ ऑगस्टच्या मोर्चाला शहर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जमणारच. लाखोंच्या उपस्थितीत मोर्चा काढणारच, आम्हाला कोण अडवते ते बघू, असा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला आहे. स्वतः कडून यांनी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं सांगून राज्यभरातील शेतकरी, कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरात जमण्याचे आवाहन केले आहे.

शेतकरी, दिव्यांगांच्या १७ मागण्यांसाठी हा मोर्चा क्रांती चौकातून निघून विभागीय आयुक्‍त कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चाचे नेतृत्त्व बच्‍चू कडू करणार आहेत. ही परवानगी नेमकी का नाकारली, हे अद्याप तरी कळू शकलं नाही. मात्र परवानगी नाकारली असली तरी मोर्चा निघणारच, अशी भूमिका कडू यांनी घेतल्याने मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कडू म्‍हणाले, की मोर्चा काढून आमची ताकद दाखवू. त्यानंतर राजकीय वाटचाली संदर्भात अंतिम निर्णय घेऊ.

आम्ही इतके मोठे नाही की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ. तो त्यांचा विषय आहे. सरकारने निर्णय घेतला तर ठीक अन्यथा आम्ही शेतकरी, शेतमजुरांची ताकद सरकारला दाखवून देऊ, असे कडू म्हणाले. कष्ट करणाऱ्याला पैसे दिले पाहिजेत. पैसे नसतील तर त्यांना सल्ला आहे की राज्‍यपालांचा चाळीस एकरवरील बंगला विका. त्याचे एक लाखभर कोटी येतील, असा टोला कडू यांनी लगावला.

विधानसभेचे रणशिंग फुंकले…
आम्ही विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य सरकारला निवेदन देणार आहोत. या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या सरकारकडे मांडणार आहोत. राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या आणि त्या मागण्यांचा शासन निर्णय काढला तर मी स्वत: विधानसभेची निवडणूक लढणार नाही. माझी जागा मी भारतीय जनता पक्षाला किंवा शिवसेनेला देईल. पण जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मग तेच मुद्दे घेऊन लढल्याशिवाय राहणार नाही, असं कडू यांनी म्हटलं आहे. आमच्या दिव्यांग आणि शेतमजुरांच्या मोर्चात महाराष्ट्रातून लोक येणार आहेत. आमचा मोर्चा हा शेतकऱ्यांसाठी आहे. आता भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा नारा देत आहे. काँग्रेस पुन्हा जातीचे नारे देत आहे. आम्ही शेतकरी आणि शेतमजूरांचा नारा देत आक्रोश मोर्चा काढत आहोत, असं कडू म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software