डॉ. कादरींच्या विरोधात काँग्रेसचे १० इच्‍छुक एकवटले!; पूर्व मतदारसंघात काँग्रेस कुणाला देणार उमेदवारी?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एमआयएमचा राजीनामा देऊन काँग्रेसकडून रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्या डॉ. गफ्फार कादरी यांना काँग्रेसच्या इच्‍छुकांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. १० इच्‍छुक उमेदवारांनी पक्षाला पत्र देत आमच्यापैकी कुणालाही तिकीट द्या, पण डॉ. कादरींना नको, अशी गळ घातली आहे. त्‍यामुळे छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : एमआयएमचा राजीनामा देऊन काँग्रेसकडून रिंगणात उतरण्याची तयारी करणाऱ्या डॉ. गफ्फार कादरी यांना काँग्रेसच्या इच्‍छुकांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. १० इच्‍छुक उमेदवारांनी पक्षाला पत्र देत आमच्यापैकी कुणालाही तिकीट द्या, पण डॉ. कादरींना नको, अशी गळ घातली आहे. त्‍यामुळे छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी नगरसेवक मोहसीन अहमद यांच्या कार्यालयात बुधवारी (२३ ऑक्‍टोबर) इच्‍छुक उमेदवारांची बैठक झाली. काँग्रेसच्याच कोणत्याही एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट द्यावे, नव्याने प्रवेश करणाऱ्याला तिकीट देऊ नये, असे पक्षश्रेष्ठींना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सचिव प्रियांका गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, मधुसूदन मिस्त्री, इम्रान प्रतापगढी, सय्यद नासेर हुसेन, खा. डॉ. कल्याण काळे व शहराध्यक्ष शेख युसूफ यांना पत्र पाठण्यात आले आहे.

डॉ. कादरी यांना उमेदवारी दिली तर आम्ही विरोध करू, असा इशारा देत बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यांच्यामुळेच या मतदारसंघात काँग्रेसची मोठी हानी झाल्याचा दावाही पत्रात करण्यात आला आहे. या पत्रावर मोहसीन अहमद, इब्राहिम पठाण, अय्युब खान, डॉ. सरताज खान, इंजि. इफ्तेखार शेख, अहमद हुसेन चाऊस, डॉ. जफर खान, कलीम छोटू कुरेशी, युसुफ मुकाती, अश्फाक खान यांच्या सह्या असल्याचे वृत्त आजच्या अंकात एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिले आहे. शहर काँग्रेस अध्यक्ष शेख युसुफ यांनी पत्रकारांना सांगितले, की १० इच्छुकांचे पत्र मिळाले असून पुढील कारवाईसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठवले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software