भाजप- ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांचा लाठीमार; रामा इंटरनॅशनलसमोर नक्की काय घडले वाचा… EXCLUSIVE छायाचित्रांसह, भाजपच्या ३२, ठाकरे गटाच्या २८ पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जळगावला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले असता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आ. अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात निदर्शने केली. त्‍याचा वचपा आज, २६ ऑगस्टला सकाळी ९ वा. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काढला. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे जालना रोडवरील रामा इंटरनॅशनलमध्ये मुक्‍कामी असताना सकाळीच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जळगावला जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले असता महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आ. अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात निदर्शने केली. त्‍याचा वचपा आज, २६ ऑगस्टला सकाळी ९ वा. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काढला. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे जालना रोडवरील रामा इंटरनॅशनलमध्ये मुक्‍कामी असताना सकाळीच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रामा इंटरनॅशनल गाठून आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. दिशा सालियान मृत्‍यूप्रकरणात आदित्य ठाकरेंच्या कथित सहभागाविरोधात हे आंदोलन होते. भाजपाचे पदाधिकारी आंदोलन करत असल्याचे कळताच ठाकरे गटाच्या नेते, पदाधिकाऱ्यांनीही रामा इंटरनॅशनलकडे धाव घेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना विरोध केला. दोन्ही गट आमनेसामने आले. घोषणाबाजी करू लागले. अंगावर धावून जाऊ लागले. त्‍यामुळे मोठा रोडा होण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेनंतर पुढील अनर्थ टळला. दरम्यान, राडेबहाद्दर भाजपच्या ३२ तर ठाकरे गटाच्‍या २८ पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

या प्रकरणात पोलीस अंमलदार पंडित राजपूत यांच्या तक्रारीवरून भाजपचे रामेश्वर दसपुते, लक्ष्मीकांत थेटे, रामेश्वर भादवे, मनोज शेजवळ यांच्यासह ३२ जणांविरुद्ध तर पोलीस अंमलदार दिलीप मोदी यांच्या तक्रारीवरून शिवसेनेचे राजू शिंदे, बाळासाहेब थोरात, नंदू लबडे, किशोर नागरे, मनोज गांगवे, दिग्विजय शेरखाने, हनुमान शिंदे, बाळासाहेब गायकवाड, सुकन्या भोसले यांच्यासह २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की काय झाले?
आदित्य ठाकरे रविवारी सायंकाळी शहरात आले. रामा इंटरनॅशनलमध्ये मुक्कामी थांबले. सकाळी ९ लाच भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरिष बोराळकर यांच्या नेतृत्त्वात भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी रामा इंटरनॅशनमध्ये घुसले. ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ते पाहून ठाकरे गटाचे कार्यकर्तेही लगेच जमा झाले. त्‍यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या दिशेने धावून अडवले. यात दोन्ही कडील पदाधिकारी, कार्यकर्त्यांत हाणामारी सुरू झाली. त्यामुळे पोलिसांनी धावून लाठीमार केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही हाणामारीत अग्रस्थानी होते. पण पोलिसांनी त्‍यांना बाजूला नेले. त्यानंतर दानवे यांनी तिथेच ठिय्या मांडला. भाजप कार्यकर्ते निघून गेल्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप त्यांनी केला. पोलीस आणि भाजप एकत्रित आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर आले असते तरी आम्ही त्यांना पुरून उरलो असतो, असा इशारा दानवे यांनी देत संताप व्यक्‍त केला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software