- News
- पॉलिटिक्स
- छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये काँग्रेसचा पाय खोलात! ; लहू शेवाळेंना उमेदवारी देऊन अतुल सावेंचा मार्ग
छत्रपती संभाजीनगर पूर्वमध्ये काँग्रेसचा पाय खोलात! ; लहू शेवाळेंना उमेदवारी देऊन अतुल सावेंचा मार्ग सोपा केला?
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात काँग्रेसने आधी मधुकर देशमुख यांना उमेदवारी दिली होती. देशमुख यांच्या गळ्यात घातलेला हार २४ तासांतच काढून घेऊन लहू शेवाळे यांच्या गळ्यात घालण्यात आला. शेवाळे यांना पूर्वमधून उमेदवारी देताना कोणते गणित काँग्रेसने समोर ठेवले हे समजायला मार्ग नाही. त्याआधी मधुकर देशमुख यांना उमेदवारी देताना […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात काँग्रेसने आधी मधुकर देशमुख यांना उमेदवारी दिली होती. देशमुख यांच्या गळ्यात घातलेला हार २४ तासांतच काढून घेऊन लहू शेवाळे यांच्या गळ्यात घालण्यात आला. शेवाळे यांना पूर्वमधून उमेदवारी देताना कोणते गणित काँग्रेसने समोर ठेवले हे समजायला मार्ग नाही. त्याआधी मधुकर देशमुख यांना उमेदवारी देताना कोणते गणित ठेवले होते, याचा उलगडा होण्याआधीच पुन्हा दुसरी गुगली काँग्रेस श्रेष्ठींनी पूर्वच्या मतदारांसमोर टाकली आहे. दुसरीकडे मुस्लिम उमेदवार द्यावा म्हणून मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीलाही केराची टोपली दाखविण्यात आली. त्यामुळे मुस्लिम पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम आहे.
लहू शेवाळे हे धनगर समाजाचे नेते असून, त्यांनी ४ वर्षांपूर्वी समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी कल्याण काळे यांची उपस्थिती होती.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
17 Dec 2025 17:32:08
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...

