आ. संजय शिरसाट यांच्या कुटुंबाच्या गाडीवर फेकला दगड!; एसटी वर्कशॉपसमोरील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आमदार संजय शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार रविवारी (७ जुलै) रात्री नऊच्या सुमारास कामगार कार्यालयाजवळील एसटी वर्कशॉपसमोर घडला. शिरसाट यांच्या पत्नी, कन्या व मुलगा यावेळी गाडीत असल्याची माहिती समोर येत आहे. शिरसाट यांचे कुटुंबीय वरद गणेश मंदिराकडून बाबा पेट्रोलपंप चौकाच्या दिशेने जात होते. यावेळी एसटी वर्क शॉपसमोर दोन […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आमदार संजय शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार रविवारी (७ जुलै) रात्री नऊच्या सुमारास कामगार कार्यालयाजवळील एसटी वर्कशॉपसमोर घडला. शिरसाट यांच्या पत्नी, कन्या व मुलगा यावेळी गाडीत असल्याची माहिती समोर येत आहे.

शिरसाट यांचे कुटुंबीय वरद गणेश मंदिराकडून बाबा पेट्रोलपंप चौकाच्या दिशेने जात होते. यावेळी एसटी वर्क शॉपसमोर दोन गटांत भांडण सुरू होते. त्‍यामुळे शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या गाडीचा वेग कमी झाला. तेवढ्यात बाजूने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने दुचाकी थांबवून शिरसाट यांच्या कुटुंबीयांच्या गाडीवर दगड फेकला. त्यामुळे चालक आणि कुटुंबीय गाडीतून उतरले. त्या वेळी तो दुचाकीस्वार पळून गेला.

गाडीला धक्का लागल्याने थोडा गोंधळ झाला, असे आमदार शिरसाट यांच्या कन्या हर्षदा यांनी पत्रकारांना सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील घटनास्थळी पोहोचले. या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याचे काम सुरू आहे. दरम्‍यान, शिरसाट यांच्या स्वीय सहायकाने गाडीवर कुठल्याही प्रकारची दगडफेक झाली नसल्याचे स्‍पष्ट केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software