हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात. मुलींशी लग्न करून त्यांना नंतर विकण्याचे प्रकार घडत आहेत. हे थांबवण्यासाठी कडक कायदा हवा. एखाद्या हिंदू मुलीने परधर्मीय मुलाशी लग्न केले, तर त्या मुलीचा आणि होणाऱ्या मुलांचा धर्म बदलू नये, अशी तरतूद कायद्यात असायला हवी, असे स्पष्ट मत करताना जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आज, १४ मार्चला व्यक्त केले.

चौका घाटातील म्हसोबा महाराज मंदिराजवळ नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रवचन सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रविवारीही (१५ मार्च) त्यांचा प्रवचन व दर्शन सोहळा होणार आहे. नरेंद्राचार्य महाराज म्हणाले, की मुस्लिम समाजात मुले म्हणजे अल्लाहची देण मानलं जातं. मात्र हिंदूंनी देशासाठी कुटुंब नियोजन पाळले. आता हिंदूंची संख्या घटत चालली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेली तीन अपत्यांची भूमिका योग्यच असल्याचं मत नरेंद्राचार्य महाराजांनी व्यक्त केले.

ख्रिश्चन मिशनरींकडून होणाऱ्या धर्मांतरावेळी अंनिस कुठे असते? ही समिती मिशनरींना विकली गेली आहे का? त्यांच्याच पैशावर ही समिती चालते का? असा सवाल करत, नरेंद्राचार्य महाराजांनी आपण कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून केवळ चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. शाळा- महाविद्यालयात ख्रिश्चन आणि मुस्लिमांचा इतिहास शिकवला जातो, पण हिंदूंचा इतिहास शिकवला जात नाही. मदरसे, ख्रिश्चन शाळांना अनुदान दिले जाते, मात्र वेद शाळांना अनुदान मिळत नाही. हिंदूंना फक्त व्होट बँक म्हणून वापरू नका, असेही नरेंद्राचार्य महाराजांनी बजावले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software