संशयास्पद वीज मीटर बदलणाऱ्या महावितरणच्या पथकावर हल्ला, पटेलनगरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पटेलनगरमध्ये महावितरणच्या पथकावर ५ ते ६ लोकांनी हल्ला करत त्यांच्याकडील वीज मीटर हिसकावून घेतल्याची घटना बुधवारी (२१ जानेवारी) सकाळी साडेअकराला घडली. सिडको एमआयडीसी पोलिसांनी पाच ते सहा अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शेख अब्दुल्ला साजीद जिलानी  (रा. नंदनवन कॉलनी, छावणी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. शेख अब्दुल्ला आणि त्यांचे सहकारी अनिल शिवलिंग जंगम, सचिन रमेश जाधव, अक्षय दामोधर पवार, व्यंकटेश कैलास गवरकर, सुरेखा अनिकेत सुरासे, रंजीत कुमार दास हे पटेलनगर भागात राहत असलेल्या लोकांच्या घराचे वीज मीटर चेक करत होते. तेथील १८ घरांचे मीटर फॉल्टी व संशयास्पद आढळले. त्यामुळे महावितरणने ते मीटर बदलून नवीन मीटर बसवले. जुने मीटर ताब्यात घेतले. त्यामुळे संतापलेल्या पाच ते सहा लोकांनी गोंधळ घालून जुने मीटर हिसकावून घेतले. आता तुम्ही इकडे यायचे नाही, असे म्हणून ते मीटर घेऊन  निघुन गेले. हे मीटर १२ हजार ६०० रुपयांचे होते. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना

Latest News

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software