छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतली आहे. भाजपचे कल्याण गायकवाड ९ विरुद्ध ८ मतांनी सभापतिपदी झाले. शिंदे गटाचे बाळासाहेब गाढे १० विरुद्ध ८ मतांनी उपसभापती झाले. ठाकरे गटाचे तीन सदस्य मतदानाला गैरहजर राहिले. त्यातच शिंदे गटातही फूट पडली. त्यामुळे भाजपचा मार्ग सोपा झाला.

निवडणूक दुपारी २ वाजता सुरू होण्याआधीच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा राडा केला. त्यांनी भाजपचे सभापतीपदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची थेट कॉलर पकडून, आमचे तीन सदस्य कुठे आहेत? त्यांना भाजपने पळवले आहे, असा आरोप करत त्यांनी दहशत माजवली. पंचायत समितीबाहेर कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला. या घटनेमुळे पंचायत समिती आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.  दानवे म्हणाले, की आमच्या तीन सदस्यांना भाजपने सत्तेची ताकद आणि पैशाचा वापर करून पळवले आहे.

649061873_1513499100781965_41485 (1)

लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू असून आम्ही हे सहन करणार नाही. या प्रकरणावर आपण लवकरच सविस्तर खुलासा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. एवढे करूनही त्यांचे ३ सदस्य काही आलेच नाहीत. याचा थेट फायदा भाजपला झाला. शिंदे गटातही मोठा गोंधळ पहायला मिळाला. ३ सदस्य मंत्री संजय शिरसाट यांचे तर ३ सदस्य संदिपान भुमरे यांच्या गटाचे होते. भुमरे गट सत्तेसाठी भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपने ठाकरे गटाचे ३ सदस्य अनुपस्थित राहतील, अशी खेळी केली. महाविकास आघाडीने अजित पवार गटाच्या अनुराग शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्यांना ८ मते पडली. केवळ एका मताने गायकवाडांचे कल्याण झाले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software