राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर मुकुंदवाडी पोलिसांची मोठी कारवाई! ४ दुचाकींसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्डा चालवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलिसांनी राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर शुक्रवारी (६ मार्च) साडेदहाच्या सुमारास मोठी कारवाई केली. ४ दुचाकींसह १ लाख ३९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार अड्डा चालविणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून, ७ जुगारी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी राहिले. त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

शुक्रवारी (६ मार्च) रात्री पोलीस अंमलदार सुजल शर्मा आणि श्री. गुरुखेल हे डायल ११२ मोबाइलवर कर्तव्यावर होते. त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की राजनगर भागातील जगताप शाळेजळील एका गल्लीलगतच्या सहान प्लॉटवर लाईट लावून एक जण बुग्गी नावाचा जुगार पैसे लावून खेळवत आहे. त्यांनी लगेचच वरिष्ठांना कळवले. त्यांच्या आदेशावरून साडेदहाच्या सुमारास सहायक फौजदार श्री. पवार, सुजल शर्मा आणि श्री. गुरुखेल यांनी जगताप शाळेजवळ येऊन जुगार अड्ड्यावर छापा मारला. जुगाऱ्यांना पोलीस आल्याची कुणकुण लागल्याने ते तेथून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. जुगार खेळविणारा व्यक्ती पकडण्यात पोलिसांना यश आले.

त्याचे नाव ज्ञानेश्वर रामभाऊ गायकवाड (वय ३४, रा. राजनगर, मुकुंदवाडी) असल्याचे समोर आले. त्याच्याकडून पळून गेलेल्यांची नावे पोलिसांनी विचारली. नितीन कांबळे (रा. रमाईनगर, मुकुंदवाडी), विजय ठाकूरकर (रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी), मायकल (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी), गणेश (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मुकुंदनगर, मुकुंदवाडी), सुरेश खोजे (रा. मुकुंदनगर) व इतर २ अनोळखी जुगारी असल्याचे गायकवाडने सांगितले. पोलिसांनी जुगार खेळण्याचे साहित्य, रक्कम व ४ मोटारसायकली असा एकूण १ लाख ३९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास मुकुंदवाडी पोलीस करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर मुकुंदवाडी पोलिसांची मोठी कारवाई! ४ दुचाकींसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्डा चालवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!!

Latest News

राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर मुकुंदवाडी पोलिसांची मोठी कारवाई! ४ दुचाकींसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्डा चालवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!! राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर मुकुंदवाडी पोलिसांची मोठी कारवाई! ४ दुचाकींसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्डा चालवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलिसांनी राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर शुक्रवारी (६ मार्च) साडेदहाच्या सुमारास मोठी कारवाई केली. ४...
गल्लीगुंडाने नंदनवन कॉलनीत घडवला थरार : दोन तरुणांना चाकूने भोसकले, एकाची प्रकृती चिंताजनक
डॉक्टर दाम्पत्याचे घर फोडले, दागिन्यांसह रोकडवर डल्ला, सन्मित्र कॉलनीतील घटना
‘झुडिओ’ची फ्रेन्चायझी मिळवून देण्याच्या आमिषाने सिल्लोडच्या व्यापाऱ्याला १४ लाखांना गंडा!; पोलीस परत मिळवू शकलेत अवघे पावणेसहा लाख!!
ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software