- News
- जिल्हा न्यूज
- ‘झुडिओ’ची फ्रेन्चायझी मिळवून देण्याच्या आमिषाने सिल्लोडच्या व्यापाऱ्याला १४ लाखांना गंडा!; पोलीस परत...
‘झुडिओ’ची फ्रेन्चायझी मिळवून देण्याच्या आमिषाने सिल्लोडच्या व्यापाऱ्याला १४ लाखांना गंडा!; पोलीस परत मिळवू शकलेत अवघे पावणेसहा लाख!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : झुडिओ कंपनीची फ्रेन्चायझी देण्याचे आमिष दाखवून सिल्लोड येथील एका प्रतिष्ठित ठेकेदाराला १३ लाख ९९ हजार ५०० रुपयांचा गंडा सायबर भामट्यांनी घातला होता. भामट्यांच्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास करत टोळीच्या बँक खात्यातून ५ लाख ७७ हजार रुपये गोठवून ठेकेदाराला परत मिळवून दिले आहेत.
फिरोज खान बिसमिल्ला खान यांनी झुडिओ शोरूमच्या फ्रेन्चायझीसाठी गुगलवर एक फॉर्म भरला होता. त्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींनी ई-मेल आणि फोनद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला. मुंबईतील मुख्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांनी फिरोज खान यांचा विश्वास संपादन केला. रजिस्ट्रेशन फी म्हणून ५० हजार ५०० रुपये, शोरूमचे भाडे व फर्निचर अशा कारणांसाठी एकूण १३ लाख ९९ हजार ५०० रुपये उकळले. संशयितांनी साइट व्हिजिटचे आश्वासन दिले, मात्र अनेक दिवस होऊनही त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने फिरोज खान यांना संशय आला. त्यांनी मुंबईतील झुडिओचे कार्यालय गाठले. तिथे गेल्यावर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात समोर आले. त्यानंतर खान यांनी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली. सायबर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. टोळीच्या खात्यातील ५ लाख ७७ हजार रुपये जप्त करून २५ फेब्रुवारीला ते खान यांच्या खात्यात जमा केले. मात्र अद्याप बाकीचे पैसे परत मिळालेले नाहीत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
Latest News
07 Mar 2026 22:48:27
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलिसांनी राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर शुक्रवारी (६ मार्च) साडेदहाच्या सुमारास मोठी कारवाई केली. ४...

