डॉक्टर दाम्पत्याचे घर फोडले, दागिन्यांसह रोकडवर डल्ला, सन्मित्र कॉलनीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : डॉक्टर दाम्पत्याचे घर फोडून चोरट्याने ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सन्मित्र कॉलनीतील विजयालक्ष्मी अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी (६ मार्च) दुपारी घडली. क्रांती चौक पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. सुधाकर सोन्याबापू शेळके (वय ५६, रा. विजयालक्ष्मी अपार्टमेंट, सन्मित्र कॉलनी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नी डॉ. जयश्री यांच्यासोबत राहतात. ते व त्यांची पत्नी आरोग्य विभागात नोकरी करतात. शुक्रवारी (६ मार्च) डॉ. जयश्री नेहमीप्रमाणे सकाळी १० ला नोकरीच्या ठिकाणी गेल्या. डॉ. सुधाकर हे दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्यांच्या बहिणीच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झाल्यामुळे तिची ड्रेसींग करण्यासाठी गेले. त्यांच्या फ्‍लॅटच्या खालच्या मजल्यावर सुनीता सतिश ढोले कुटुंबासह राहतात. त्यांच्याही घराला कुलूप लावलेले असल्याचे डॉ. सुधाकर यांनी जाताना पाहिले.

बहिणीची ड्रेसींग करून दुपारी साडेतीनला डॉ. सुधाकर हे घरी परतले असता घराचे कुलूप तोडलेले दिसले. बाहेरून दरवाजाची कडी लावलेली दिसली. त्यानंतर बेडरूममधील सामान उचकटून अस्ताव्यस्त पडलेले दिसले. सुनीता ढोले यांच्याघरीदेखील चोरी झाल्याचे याचदरम्यान समोर आले. दोघांच्या घरातून चांदीचे जोडवे, पैंजण, कुंकवाचे करंडे, सोन्याचे कानातले दागने, रोकड, कारचे आरसी, आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास शेवाळे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर मुकुंदवाडी पोलिसांची मोठी कारवाई! ४ दुचाकींसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्डा चालवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!!

Latest News

राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर मुकुंदवाडी पोलिसांची मोठी कारवाई! ४ दुचाकींसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्डा चालवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!! राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर मुकुंदवाडी पोलिसांची मोठी कारवाई! ४ दुचाकींसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्डा चालवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलिसांनी राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर शुक्रवारी (६ मार्च) साडेदहाच्या सुमारास मोठी कारवाई केली. ४...
गल्लीगुंडाने नंदनवन कॉलनीत घडवला थरार : दोन तरुणांना चाकूने भोसकले, एकाची प्रकृती चिंताजनक
डॉक्टर दाम्पत्याचे घर फोडले, दागिन्यांसह रोकडवर डल्ला, सन्मित्र कॉलनीतील घटना
‘झुडिओ’ची फ्रेन्चायझी मिळवून देण्याच्या आमिषाने सिल्लोडच्या व्यापाऱ्याला १४ लाखांना गंडा!; पोलीस परत मिळवू शकलेत अवघे पावणेसहा लाख!!
ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software