गल्लीगुंडाने नंदनवन कॉलनीत घडवला थरार : दोन तरुणांना चाकूने भोसकले, एकाची प्रकृती चिंताजनक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नंदनवन कॉलनीतील जिजाऊ गार्डनच्या गेटजवळ एका गल्लीगुंडाने दोन तरुणांना चाकूने भोसकले. एका तरुणाच्या पोटात दोनदा चाकू खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी (३ मार्च) रात्री आठच्या सुमारास घडली.

साहिल बबन साळवे व रितेश साळवे (दोघे रा. गंगाबावडीजवळ, नंदनवन कॉलनी) अशी जखमींची नावे आहेत. नरेन मधुकर देहरे (रा. गंगाबावडीजवळ, नंदनवन कॉलनी) असे हल्लेखोराचे नाव आहे.  त्याच्याविरुद्ध छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उज्ज्वला बबन साळवे (वय ३९, रा. गंगाबावडीजवळ, नंदनवन कॉलनी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पती बबन साळवे, तीन मुले कुणाल, साहिल आणि अनुष यांच्यासह राहतात. मंगळवारी (३ मार्च) संध्याकाळी सहाला त्या भुजबळनगरला घरकाम करण्यासाठी गेल्या होत्या. तिन्ही मुले घरी होती. कामावरून त्या रात्री साडेआठला घरी येत असताना माऊली मेडिकलजवळ माहिती मिळाली, की नंदनवन कॉलनीतील जिजाऊ गार्डनच्या गेटजवळ नरेन देहरे नावाच्या तरुणाने साहिलच्या पोटात दोन वेळा चाकू खुपसला.

तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला घाटी रुग्णालयात नेले आहे. उज्ज्वला या तातडीने घाटी रुग्णालयात गेल्या. साहिलचा चुलत भाऊ रितेश साळवे यालाही नरेन देहरे याने डाव्या मांडीवर चाकू मारून गंभीर जखमी केल्याने त्यालाही घाटीत दाखल केलेले होते. साहिल व रितेश हे जेवण करून नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी जिजाऊ गार्डनला चालत जात होते. मागून नरेन आला. तो त्यांना विनाकारण शिवीगाळ करत होता. साहिलने शिवीगाळ करू नको म्हटले. त्यावरून नरेनने साहिलची कॉलर धरली आणि तुला जीवेच मारतो, असे म्हणून हातातील चाकू दोनवेळा साहिलच्या पोटात डाव्या बाजूला खुपसला. साहिलला रक्तबंबाळ होऊन कोसळला. रितेशलाही डाव्या पायाच्या मांडीवर नरेनने चाकू मारून जखमी केले. रितेश जोरात ओरडल्याने शहबाज शेख धावून आला. तोपर्यंत नरेन पळून गेला. रितेश व शहबाज यांनी शहबाजच्या मोटारसायकलीवरून साहिलला घाटी रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब नगावे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर मुकुंदवाडी पोलिसांची मोठी कारवाई! ४ दुचाकींसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्डा चालवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!!

Latest News

राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर मुकुंदवाडी पोलिसांची मोठी कारवाई! ४ दुचाकींसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्डा चालवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!! राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर मुकुंदवाडी पोलिसांची मोठी कारवाई! ४ दुचाकींसह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्डा चालवणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडी पोलिसांनी राजनगरमध्ये जुगार अड्ड्यावर शुक्रवारी (६ मार्च) साडेदहाच्या सुमारास मोठी कारवाई केली. ४...
गल्लीगुंडाने नंदनवन कॉलनीत घडवला थरार : दोन तरुणांना चाकूने भोसकले, एकाची प्रकृती चिंताजनक
डॉक्टर दाम्पत्याचे घर फोडले, दागिन्यांसह रोकडवर डल्ला, सन्मित्र कॉलनीतील घटना
‘झुडिओ’ची फ्रेन्चायझी मिळवून देण्याच्या आमिषाने सिल्लोडच्या व्यापाऱ्याला १४ लाखांना गंडा!; पोलीस परत मिळवू शकलेत अवघे पावणेसहा लाख!!
ओढणीने हात-पाय बांधून तरुणीवर बलात्कार, १९ वर्षीय तरुणाला २ किमी पाठलाग करून पकडले!; कन्नड तालुक्यातील खळबळजनक कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software