अतिपावसाने ४० टक्‍क्‍यांहून अधिक कापूस उत्पादन घटले, आता उरले सुरले वेचायलाही मजूर खाताहेत भाव!; दराचीही शाश्वती नसल्याने शेतकरी हवालदील!!, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चित्र 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

लाडसावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर (राजू जैवळ : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे. सततच्या अतिवृष्टीने पीक उत्पादन कमालीचे घटले असून, उरलेला कापूस वेचणीसाठीही काही ठिकाणी मजूर मिळत नाहीत, तर काही ठिकाणी मजूर लावणे परवडत नसल्याने शेतकरी कुटुंब पहाटेच कापूस वेचणीसाठी शेत गाठत असल्याचे चित्र आहे. अस्मानी संकटातून कसेबसे पुढे गेल्यानंतर बाजारपेठेत शेतमालाला मिळणाऱ्या अस्थिर दरामुळे सुलतानी संकट पुढे वाढूनच ठेवले आहे.

यंदाच्या हंगामात छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सर्वच भागांत अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापूस, बाजरी आणि मका या प्रमुख पिकांवर अतिपावसाचा मोठा परिणाम झाला आहे. नुकसानीमुळे उत्पादनात सरासरी ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट आल्याचे शेतकरी बंडू पवार यांनी सांगितले. या गंभीर परिस्थितीवर शेतकरी अनिल पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की यावर्षी पावसाने आमचे खूप नुकसान केले आहे. कपाशीला चांगला बोंड लागले होते. पण पावसामुळे बोंड सडून गेले. जे काही थोडे पीक हाती आले आहे, ते वेचायला मजूर मिळत नाहीत.

मजूर मिळाले तर त्यांना प्रतिकिलो १० ते १५ दर द्यावा लागतो. जो परवडणारा नाही. गावातली लोकं कामाला येत नाहीत. ते जवळच्या शेंद्रा, करमाड एमआयडीसीत जात आहेत. त्यामुळे बाहेरून मजूर आणावे लागतात. माझा अर्धा कापूस शेतातच पडून आहे. एवढा खर्च करून मेहनत करूनही हाती काहीच लागणार नाही. उत्पादन कमी आहे आणि बाजारात दराची शाश्वती नाही. कापसाचा दर सध्या ६८०० रुपये प्रति क्विंटल चालू आहे. पिकावर झालेला खर्च आणि सध्या मिळत असलेला दर अजिबात ताळमेळ खात नाही. याकडे सरकारने वेळीच लक्ष देऊन खरेदी केंद्रे सुरू करावीत आणि व्यापाऱ्यांची मक्‍तेदारी संपुष्टात आणावी, अशी मागणी होत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...

Latest News

अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू... अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची ‘वाय प्लस एस्कॉर्ट' सुरक्षा सरकारने काढून घेताच...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
मयूर पार्कमध्ये मंगळसूत्र चोरट्यांचा थरार : विवाहितेची लाखाची सोनसाखळी हिसकावून दुचाकीवरून ठोकली धूम!
इंदिरानगरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
छत्रपती संभाजीनगरजवळील इंग्रजी शाळेला भीषण आग, रविवारच्या सुटीमुळे टळला अनर्थ!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software