२०२६ मध्ये जगात होणार मोठी उलथापालथ!; तुमचे पैसे वाचवून ठेवा, परदेशात राहणाऱ्यांनाही परतावे लागेल घरी
प्राचीन ग्रंथ ‘भविष्य मलिका’मध्ये नव्या वर्षातील काय आहेत भविष्यवाण्या...
२०२६ मध्ये महायुद्ध होणार आहे का? २०२६ मध्ये जगाचा अंत होईल का? सध्या अनेक प्रकारच्या भविष्यवाण्या प्रसिद्ध होत आहेत. २०२६ हे वर्ष अगदी जवळ आले आहे. पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये असंख्य भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. ‘भविष्य मलिका’मध्येही २०२६ बद्दल काही धक्कादायक भविष्यवाण्या आहेत. ‘भविष्य मलिका’च्या मते, आपण परिवर्तन काळात आहोत. या काळात अनेक वेगवेगळ्या घटना घडणार आहेत, ज्यामुळे उलथापालथ होऊ शकते...
महागाई आणखी वाढेल का? : ‘भविष्य मलिका’ने जागतिक अस्थिरतेचा अंदाज वर्तवला आहे, म्हणजेच जागतिक आर्थिक परिस्थितीबाबत तणाव वाढण्याची शक्यता आहे. महागाई पूर्वीपेक्षा लक्षणीयरीत्या वाढेल. यामुळे अनेक देशांमध्ये गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल, ज्याची सुरुवात पाश्चात्य देशांमध्ये होण्याची शक्यता आहे. भारताबाहेर राहणाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागू शकते. जे लोक भक्तीचा मार्ग अवलंबतात आणि परमेश्वराचे नाव जपतात तेच सुरक्षित राहतील.
साथीचा रोग येईल का? : २०२६ मध्ये अज्ञात रोग आणि विषाणू पसरतील आणि २०२७ पर्यंत विनाशकारी बनू शकतात. ‘भविष्य मलिका’यांच्या मते, २०३२ पर्यंत चौसष्ट प्रकारचे आजार उद्भवू शकतात. युरोपमध्ये किरणोत्सर्गाची पातळी वाढू शकते, ज्यामुळे सार्वजनिक जीवनावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. हा मोठ्या बदलाचा काळ ठरू शकतो.

