या ५ गोष्टी सांगतील की तुम्हाला लागलंय कुणाचे तरी वेड…

On
"छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूज' वेबसाईटवर प्रसिद्ध होणारा मजकूर, छायाचित्रे 'मेट्रोपोलिस पोस्ट' वृत्तपत्राच्या परवानगीशिवाय पूर्णतः किंवा अंशतः कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना कुणीही आढळल्यास कोणतीही वेगळी नोटीस न देता कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्र

तुम्ही प्रेमात पडला आहात का? कदाचित तुम्ही प्रेमात पडला असाल, पण लक्षात येत नसेल… कारण तो ताप नाही जो थर्मामीटरने मोजता येतो ना भाजीत मीठ कळतं तसं लगेच लक्षात यायला. ही एक अतिशय खास भावना आहे जी तुम्हाला हळूहळू जाणवते. प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतो. पण कुणाच्यातरी प्रेमात आपलं हृदय धडधडायला लागलंय हे कसं […]

तुम्ही प्रेमात पडला आहात का? कदाचित तुम्ही प्रेमात पडला असाल, पण लक्षात येत नसेल… कारण तो ताप नाही जो थर्मामीटरने मोजता येतो ना भाजीत मीठ कळतं तसं लगेच लक्षात यायला. ही एक अतिशय खास भावना आहे जी तुम्हाला हळूहळू जाणवते. प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतो. पण कुणाच्यातरी प्रेमात आपलं हृदय धडधडायला लागलंय हे कसं कळणार? फक्त तुमचा गोंधळ दूर करण्यासाठी, आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी आणि लक्षणांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला कळू शकेल की तुम्ही खरोखरच एखाद्याच्या प्रेमात पडला आहात…

विचारात हरवाल : एखादी व्यक्ती प्रेमात हरवून जाते. तुम्हीही त्या एखाद्या व्यक्तीच्या विचारात हरवून जात असाल, कोणाशीही बोलताना तिचाच विचार करत असाल तर तुम्ही प्रेमात पडले म्हणून समजा.
अस्वस्थ वाटणे : सर्वकाही जवळ असूनही तुम्हाला काहीतरी चुकल्यासारखे वाटते का? चांगला दिवस गेल्यावरही तुमचे मन उदास असते का? जर होय, तर हे निश्चित आहे की तुम्ही प्रेमात पडला आहात. जर तुमचे हृदय एखाद्यासाठी अस्वस्थपणा अनुभवत असेल तर तुम्ही खूप प्रेमात आकंठ बुडालेले आहात.

कल्पनाशक्ती निर्माण करणे : प्रेमात प्रत्येकासोबत घडणारी एक गोष्ट म्हणजे कल्पना करणे. जर तुम्ही एखाद्याबद्दल खूप विचार करायला सुरुवात केली असेल, चित्रपट पाहताना स्वत: ला प्रेमळ जोडप्यामध्ये पाहण्यास सुरुवात केली असेल आणि तुमच्या विचारांमध्येच नाही तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तिच्याशी जोडण्यास सुरुवात केली असेल तर तुम्ही नक्कीच कोणाच्यातरी प्रेमात पडत आहात.

इतर कोणापेक्षा स्वतःकडे अधिक लक्ष देणे : असे बरेचदा घडते की आपण आपले कपडे, जीवनशैली आणि वैयक्तिक गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही. परंतु जर गेल्या काही दिवसांपासून तुम्ही तुमच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टीवर लक्ष केंद्रित करू लागला असाल किंवा तुमचा ड्रेसिंग सेन्स बदलू लागला असेल तर स्वतःला आरशात पहा, मग खात्री आहे की तुम्ही कोणाच्यातरी प्रेमात पडला आहात. तुमच्या भावना ओळखा आणि ज्याच्यासाठी तुमच्या अंतःकरणात मनापासून प्रेम आहे तिच्याशी त्या व्यक्त करा.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...

Latest News

छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही... छत्रपती संभाजीनगरात महिनाभरात आढळले ८ मृतदेह, ज्यांची ओळख पटली नाही, अशा अवस्थेत होते, की तुम्ही बघूही शकणार नाही...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर शहरात अनोळखी मृतदेह मिळून येण्याचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. १ ऑक्‍टोबरपासून...
सामाजिक कार्यकर्तीच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शिवीगाळीचा भडीमार, पोलिसांनी २३ जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरातील प्रकार
लई हुशारी केली, पण शेवटी घडा भरलाच!; ‘कायद्या’चा गैरवापर करून लाखो रुपये उकळले, अखेर दुकलीला आता पडल्या बेड्या!!, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पोलिसांची कामगिरी, नक्की काय आहे स्टोरी वाचूया... 
मंजूरपुऱ्यातील ‘बॉस पब्लीक चॉईस’ रेडिमेड कपड्यांचे दुकान फोडले, चोरट्यांनी शर्ट-पँट नेले...
गोमटेश मार्केटमध्ये भल्ला चाट भंडारसमोर तरुणांमध्ये हाणामारी!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software