- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- EXCLUSIVE : माथेफिरू शेतकऱ्याने खोदला आ. बंब यांनी बनवलेला रस्ता!; पावसात विद्यार्थ्यांची शाळा अन्
EXCLUSIVE : माथेफिरू शेतकऱ्याने खोदला आ. बंब यांनी बनवलेला रस्ता!; पावसात विद्यार्थ्यांची शाळा अन् शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद!, वस्तीवरून मुख्य रस्त्यापर्यंत येण्याजाण्याचीही पंचाईत!!, अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने संताप
On

छत्रपती संभाजीनगर (भालचंद्र पिंपळवाडकर : सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट आ. प्रशांत बंब यांच्या नाकावर टिच्चून त्यांनी बनवलेला रस्ता खोदला आहे. सरकारच्या निर्णयालाही फाट्यावर मारले असून, अधिकाऱ्यांच्या आदेशालाही तो जुमानत नसल्याने या रस्त्यावर अवलंबून असलेले शेतकरी हवालदील झाले आहेत. सोबतच विद्यार्थी मात्र चिंताग्रस्त चेहऱ्याने आता शाळेत जायचे कसे, या संकटात सापडले आहेत. […]
छत्रपती संभाजीनगर (भालचंद्र पिंपळवाडकर : सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने थेट आ. प्रशांत बंब यांच्या नाकावर टिच्चून त्यांनी बनवलेला रस्ता खोदला आहे. सरकारच्या निर्णयालाही फाट्यावर मारले असून, अधिकाऱ्यांच्या आदेशालाही तो जुमानत नसल्याने या रस्त्यावर अवलंबून असलेले शेतकरी हवालदील झाले आहेत. सोबतच विद्यार्थी मात्र चिंताग्रस्त चेहऱ्याने आता शाळेत जायचे कसे, या संकटात सापडले आहेत. शेतमाल शेतातून ने-आण करता येत नाही. शेतवस्तीवर राहणाऱ्यांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. माथेफिरू शेतकऱ्याने अन्य शेतकरी आणि रहिवाशांसोबतच सरकारी यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना घायकुतीला आणले आहे. त्यामुळे त्याच्यावर कुणाचा वरदहस्त आहे का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
माथेफिरू शेतकऱ्याच्या कृत्यामुळे हैराण झालेल्या शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी उद्विग्नता व्यक्त केली आहे. एकीकडे रस्त्यासाठी छत्रपती संभाजीनगरात मोठमोठ्या इमारती पाडल्या जात असताना इकडे रस्ताच खोदण्यात आल्याचा प्रकार घडल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. चिमुकली शाळकरी मुले आपल्या भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि आ. बंब यांना रस्त्यासाठी आर्जव करताना व्हिडीओत दिसत आहेत. त्यामुळे आता प्रशासकीय यंत्रणा, ज्यांनी बनवलेला रस्ता खोदला ते आ. बंब याप्रकरणात लक्ष घालून शेतकरी, विद्यार्थ्यांना दिलासा देतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात आ. प्रशांत बंब यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी वारंवार संपर्क केला, मात्र होऊ शकला नाही.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
सुलीभंजनचा उपसरपंच सुनील घुसळे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार
By City News Desk
Latest News
26 Jul 2025 12:29:38
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला....