- News
- एक्सक्लुझिव्ह
- दोन्ही हातांनी ओढल्या १६ बुलेट!; धिप्पाड साडेसात फुटी सुखदेव सिंहांना पाहून छत्रपती संभाजीनगरकर म्हण...
दोन्ही हातांनी ओढल्या १६ बुलेट!; धिप्पाड साडेसात फुटी सुखदेव सिंहांना पाहून छत्रपती संभाजीनगरकर म्हणाले, बाबोऽऽ इतका मोठा माणूस!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर साहेब यांच्या शहीद दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील सिंधी कॉलनीत शनिवारी (२२ नोव्हेंबर) सायंकाळी नगर कीर्तन झाले. यात सहभागी धिप्पाड अशा सुखदेव सिंह यांनी केलेल्या चित्तथरारक कसरतींनी सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकवला. त्यांनी दोन्ही हातांनी चक्क १६ बुलेट ओढण्याचा विक्रम केला.
सर्वांचे आकर्षण ठरलेले सुखदेव सिंह खास पंजाबहून छत्रपती संभाजीनगरला आले होते. ते पंजाबमधील फतेहगढ साहिब येथील शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांच्या नावावर ६ आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड आहेत. यात गिनीज, अमेरिकन, एशिया, यूएसए, इंडिया बुकचा समावेश आहे. एवढी मोठी शरीरयष्टी असूनही ते केवळ दोन पोळ्या खातात आणि रोज ६ लिटर दूध पितात. भारतातील ते सर्वाधिक उंचीचे व्यक्ती असल्याचे सांगितले जाते. भारतात साधारण व्यक्तीची उंची ५.८ फुटांपर्यंत असते. दी सन या ब्रिटिश वृत्तपत्राने काही काळापूर्वी सुखदेव सिंग यांच्यावर विशेष बातमी प्रसिद्ध केली होती. त्यातील उल्लेखानुसार, ते लहानपणापासूनच गर्दीत वेगळे दिसत होते. समवयस्कांच्या उंचीपेक्षा ते जास्त उंच होते. ते कपडे घेण्यासाठी दुकानात जाऊ शकत नाहीत. त्यांना ते शिंप्याकडूनच शिवून घ्यावे लागतात. त्यांना कपड्यांसाठी तब्बल ९ मीटर कापड लागते. ते बस किंवा कारमध्ये बसू शकत नाहीत. त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मोटारसायकलचा वापर करावा लागतो. ती त्यांच्या तुलनेत खूपच छोटी दिसते. ते स्थानिक सेलिब्रिटी असून, त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी लोक दूरदूरून येतात. जगात सर्वात उंच माणूस तुर्कीत असून त्याचे नाव सुलतान कोसेन आहे, जो ८ फूट ३ इंच उंच आहे. सुखदेव सिंह यांची काही छायाचित्रे पुढे पहा :






आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
14 Mar 2026 17:16:35
हिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात गायीची मूर्ती ठेवल्याने आजूबाजूच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो. असे मानले जाते की...

