शूटिंग करताना शाहरुख खान जखमी, १ महिना विश्रांती घेण्याचा डॉक्‍टरांचा सल्ला

On

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. किंग चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना एका अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान शाहरुखला दुखापत झाली असून, यामुळे त्‍याने शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे. डॉक्टरांनी त्याला एक महिना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मुंबईतील एका फिल्म स्टुडिओमध्ये एका ॲक्शन सीनचे शूटिंग सुरू होते. किंग चित्रपटात शाहरुख त्याची मुलगी सुहाना खानसोबत दिसणार आहे. […]

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. किंग चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना एका अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंग दरम्यान शाहरुखला दुखापत झाली असून, यामुळे त्‍याने शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे. डॉक्टरांनी त्याला एक महिना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

मुंबईतील एका फिल्म स्टुडिओमध्ये एका ॲक्शन सीनचे शूटिंग सुरू होते. किंग चित्रपटात शाहरुख त्याची मुलगी सुहाना खानसोबत दिसणार आहे. असे म्हटले जाते की शूटिंगदरम्यान त्‍याच्या स्नायूंना दुखापत झाली. असेही सांगितले गेले, की दुखापत फारशी गंभीर नाही. दुखापतीमुळे शाहरुख त्याच्या टीमसह आवश्यक उपचारांसाठी अमेरिकेला गेला आहे. यामुळे किंग चित्रपटाचे शूटिंग सध्यासाठी थांबले आहे. जुलै ते ऑगस्ट दरम्यानचे शूटिंग शेड्यूल पुढे ढकलण्यात आले आहे. आता पुढील शेड्यूल सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. या वर्षाच्या सुरुवातीला जयपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान शाहरुख कॉलरखाली काळी टेप लावताना दिसला होता. तेव्हाही असा अंदाज होता की तो किंग या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जखमी झाला असावा.

जवान आणि पठाण चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर किंग हा चित्रपट शाहरुख खानच्या सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे. पठाण आणि वॉर चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे सिद्धार्थ आनंद हे त्याचे दिग्दर्शन करत आहेत. चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहानादेखील तिच्या वडिलांसोबत दिसणार आहे. सुहानाने द आर्चीज चित्रपटाद्वारे डिजिटल पदार्पण केले. अशा परिस्थितीत, किंग हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा तिचा पहिला चित्रपट असेल. अलिकडेच अशी चर्चा आहे की या चित्रपटात दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, जयदीप अहलावत, अनिल कपूर, अर्शद वारसी आणि जॅकी श्रॉफदेखील आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!

Latest News

पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी! पोलीस अंमलदाराचा घाटी रुग्णालयात राडा; डॉक्‍टरांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाटी रुग्णालयातील अपघात विभागात शुक्रवारी (२५ जुलै) रात्री साडेदहाच्या सुमारास एका पोलीस अंमलदाराने राडा केला....
सुलीभंजनचा उपसरपंच सुनील घुसळे वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार
ज्‍याला त्रास होत असेल तर त्‍याने येऊन खुर्चीला हार घाला म्‍हणताच, नागरिकांची उडाली झुंबड!; लाडसावंगीत हे काय भलतंच आंदोलन...
१७ वर्षीय मुलीला लाकडी छडीने बेदम मार!, विद्यादीप बालगृहातील सिस्टर मंगल शहाचा क्रूरपणा उघड
चंपा चौक ते जालना रोड रस्ता १०० फुटांचाच होणार, जी. श्रीकांत यांचा नागरिकांशी थेट संवाद, म्‍हणाले, कोणी अडथळा आणला तर सोडणार नाही!, हर्सूलमध्ये सोमवारपासून पाडापाडी

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software