धर्मेंद्र यांना रुग्णालयातून मिळाला डिस्‍चार्ज, आता घरीच उपचार होणार, कुटुंबीय म्हणाले, कोणताही अंदाज लावू नका...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

बॉलीवूडचे "ही मॅन’ ८९ वर्षीय धर्मेंद्र यांना आज, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर कुटुंबाने त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती देणारे निवेदन जारी केले आहे. त्यांनी माध्यमांना आणि जनतेलाही अंदाज लावण्यापासून दूर राहण्याचे आणि गोपनीयता राखण्याचे आवाहन केले आहे. धर्मेंद्र यांच्यावर आता घरीच उपचार केले जातील.

बॉबी देओल सकाळी ७ वाजता मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचला आणि त्याचे वडील धर्मेंद्र यांना रुग्णवाहिकेतून घरी नेले. त्यानंतर कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की आम्ही मीडिया आणि सामान्य जनतेला विनंती करतो की त्यांनी पुढील कोणताही अंदाज लावू नये किंवा अफवा पसरवू नये. या काळात धर्मेंद्रजी आणि त्यांच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. आम्ही सर्वांच्या प्रेमासाठी, प्रार्थनांसाठी आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत. कृपया त्यांचा आदर करा. कारण ते तुमच्यावर प्रेम करतात.

श्वास घेण्याच्या त्रासामुळे १० नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल
धर्मेंद्र यांना १० नोव्हेंबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. रुग्णालयात धर्मेंद्र सतत वैद्यकीय देखरेखीखाली होते आणि आवश्यक चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर, त्यांची प्रकृती बिघडल्याची बातमी आली, त्यानंतर धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. तथापि, पत्नी हेमा मालिनी आणि मुलगा सनी देओल यांच्या टीमने आरोग्यविषयक अपडेट दिले की धर्मेंद्रची प्रकृती सुधारत आहे आणि त्याच्या लक्षणांनुसार उपचार सुरू आहेत.

शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि गोविंदा यांनी रुग्णालयात धर्मेंद्र यांची भेट घेतली...
धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडत चालल्याने सर्वजण घाबरले होते. त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि गोविंदा यांच्यासह गोविंदा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी धर्मेंद्रला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. दरम्यान, सनी देओल आणि बॉबी देओल सतत रुग्णालयात उपस्थित होते. त्यांच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांतून त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दलचे दुःख दिसून येत होते. हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल देखील रुग्णालयात फेऱ्या मारत होत्या. दरम्यान, धर्मेंद्रच्या पहिल्या लग्नातील दोन मुली, अजिता आणि विजेता यांनाही बोलावण्यात आले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software