- News
- एंटरटेनमेंट
- अभिनेत्री सेलिना जेटलीची विशेष मुलाखत : गिफ्ट म्हणून मिळाली घटस्फोटाची नोटीस... स्वतःच्या बचावासाठी
अभिनेत्री सेलिना जेटलीची विशेष मुलाखत : गिफ्ट म्हणून मिळाली घटस्फोटाची नोटीस... स्वतःच्या बचावासाठी अन् आवाज उठवण्यासाठी भारतात परतले...!
४४ वर्षीय सेलिना जेटलीचे २०१० मध्ये लग्न झाले होते. तेव्हापासून ती ऑस्ट्रियामध्ये राहत होती. खासगी आयुष्यातील वाईट अनुभववानंतर आता ती मुंबईत परतली आहे. तिने पती पीटर हागविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला आहे. २०२४ पासून यूएईमध्ये तुरुंगात कैद असलेल्या तिच्या भावाबाबत तिला मोठ्या अडचणी येत आहेत. विशेष मुलाखतीत तिने वैयक्तिक आयुष्यातील या सर्वात कठीण काळाबद्दल खुलासा केला आहे. तिने सांगितले की ती हार मानणार नाही आणि सन्मानाने हा लढा देईल...
सेलिना : सोशल मीडियावर जे आपण टाकतो किंवा दाखवतो तो वास्तविक जीवनाचा एक छोटासा भाग असतो. जगाला हे कळण्यापूर्वी मी वर्षानुवर्षे या वाईट संसारात झुंजत होते. अनेक महिलांप्रमाणे मी माझ्या मुलांसाठी गोष्टी सामान्य ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु वैयक्तिकरित्या, मला खूप कठीण परिस्थितींना तोंड द्यावे लागत होते.
प्रश्न : इतकी वर्षे या वाईट नात्यात राहिल्याबद्दल पश्चात्ताप होतो का? वाटते का की तुम्ही आधीच भारतात परतायला हवे होते?
सेलिना : माझे कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी मी केलेल्या कोणत्याही प्रयत्नांबद्दल मला पश्चात्ताप होत नाही. माझे पालक गमावल्यानंतर स्वतःसाठी उभे राहणे एवढे सोपे नव्हते. मी माझे जवळचे भावनिक समर्थक आधीच गमावले होते. मला सर्वकाही गमावण्याची भीती वाटत होती. आर्थिकदृष्ट्या मी एकदम कोणते पाऊल उचलणे एवढे सोपे नव्हते. माझी मुले अशा वातावरणात वाढले होते, लगेच त्यांना काटकसरीच्या आयुष्यात ढकलणे मला योग्य वाटत नव्हते. मी स्वतःच्या रक्षणाची काळजी तेव्हाच करू शकत होते, जेव्हा मी सर्व गोष्टी माझ्या मुलांसाठी जशाच्या तसा ठेवण्यात यशस्वी राहील. मला मुलांची काळजी होती आणि त्यामुळेच सर्व सहन करत होती.
.jpg)
प्रश्न : २०१८ मध्ये तुम्ही तुमचे आई- वडील गमावले. तुमच्या मुलांनंतर तुमचा भाऊ तुमचा सर्वात जवळचा नातेवाईक आहे का?
सेलिना : मुले, भावाव्यतिरिक्त माझी एक ९५ वर्षांची आजी आहे. जिच्यावर मी खूप प्रेम करते. माझा इतरांशी फारसा संपर्क नसतो. मी त्यापैकी काहींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने विविध कारणांमुळे, त्यांनी दूर राहणे पसंत केले. या प्रवासाने मला दाखवून दिले आहे की जीवन कठीण असताना खरोखर तुमच्या पाठीशी कोण उभे राहते.
प्रश्न : तुमचे भाऊ मेजर (निवृत्त) विक्रांत कुमार जेटली, सप्टेंबरपासून अबू धाबीमध्ये अटकेत आहेत. त्यांना सोडण्यासाठीच्या या लढाईत तुम्ही एकटे आहात का? या प्रकरणात काय चालले आहे? तुम्ही त्यांच्याशी शेवटचे कधी बोललात?
सेलिना : मी पूर्णपणे एकटी नाही. परंतु कायदेशीर आणि राजनैतिक मार्गांनी पुरेपूर प्रयत्न करत आहे. हे प्रकरण खूप संवेदनशील आहे आणि अजूनही चालू आहे. मला त्याबद्दल माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगावी लागेल. माझ्या भावाशी संवाद साधण्याचे पूर्ण स्वातंत्र्य नसणे हे माझ्यासाठी सर्वात वेदनादायक पैलूंपैकी एक आहे.
प्रश्न : तुमच्या भावाशी तुमचे नाते कसे आहे आणि तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणींबद्दल त्याच्याशी बोलाल का?
सेलिना : आम्ही सोबत हसलो, रडलो, गमतीजमती केल्या. आई-वडिलांच्या शेवटच्या काळात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलो. त्या अनुभवांमुळे आमच्यात एक असे बंधन निर्माण झाले आहे जे शब्दात वर्णन करता येत नाही. हो, तो खरोखरच माझी ताकद आहे.
प्रश्न : तुम्ही नवीन जीवन सुरू करण्यासाठी भारतात आला आहात का?
सेलिना : माझे भारतात येणे ही माझी निवड नव्हती, तर ती एक गरज होती. मला स्वतःचे, माझ्या प्रतिष्ठेचे आणि माझ्या स्वाभिमानाचे रक्षण करायचे होते. भेटवस्तूच्या नावाखाली घटस्फोटाची नोटीस मिळाली. मला खूप धक्का बसला. माझ्या मायदेशी परतल्याने मला खंबीरपणे उभे राहण्याची, डोके उंच करून लढण्याची आणि माझा आवाज परत मिळवण्याची संधी मिळाली आहे.
प्रश्न : तुम्ही अभिनय क्षेत्रात परतण्याची योजना आखत आहात का?
सेलिना : माझे काम हे फक्त एक प्रोफेशन नाही. ते एक्सप्रेशनचे माध्यम आहे. माझे काम मला भावनिक, आर्थिक, मानसिक आणि इतर अनेक प्रकारे टिकवून ठेवते. त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
प्रश्न : गेल्या काही वर्षांपासून तुम्ही कठीण काळातून जात आहात. या अनुभवांमुळे तुमची आंतरिक शक्ती आणि आत्म-मूल्य यासारख्या गोष्टींबद्दलची तुमची समज कशी बदलली आहे?
सेलिना : गेल्या काही वर्षांत मला बाहेरून दिसणारी प्रत्येक गोष्ट हिरावून घेतली गेली आहे. त्यांनी मला मी खरोखर कोण आहे हे पाहण्यास भाग पाडले आहे. मी शिकले की आंतरिक शक्ती शांत आणि चिकाटीची असते; ती दिखावा नाही. आज, माझी स्वतःची मूल्ये म्हणजे स्वतःसाठी, माझ्या मुलांसाठी आणि माझ्या कुटुंबाच्या मूल्यांसाठी उभे राहणे, जरी उभे राहणे कठीण आणि भीतीदायक असले तरीही.

