छावा चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण : शिवानंद भानुसे यांचा आरोप, कारस्थान शिर्केंनी नव्हे रंगनाथ स्वामीने केल्याचा दावा

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या छावा चित्रपटाला सध्या राज्‍यभर उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे कौतुक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी छावा चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण केले असल्याचा आरोप केला आहे. काही प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा दावा त्‍यांनी केला आहे. एका वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भानुसे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या छावा चित्रपटाला सध्या राज्‍यभर उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे कौतुक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी छावा चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण केले असल्याचा आरोप केला आहे. काही प्रसंग चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा दावा त्‍यांनी केला आहे.

एका वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, भानुसे यांनी म्‍हटले आहे, की छावा चित्रपटात इतिहासाची मोडतोड केली गेली आहे. चुकीच्या गोष्टी दाखवल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराणी सोयराबाई यांनीच औरंगजेबाचा मुलगा अकबरला पत्र लिहून संभाजीराजेंविरोधात कटकारस्थान केल्याचे दाखवले, मात्र हे खोटे आहे. अनाजी पंत आणि सहकाऱ्यांनी हे काम केलं, हे स्पष्टीकरण येणे गरजेचं होतं. सिंह आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात कधीच लढाई झालेली नाही. काल्पनिक दाखवलं गेलं आहे. संभाजीराजेंचे मेहुणे गनोजी शिर्के यांनीच संभाजी महाराजांना पकडून दिल्याचंही चुकीचं दाखवल्याचा दावा भानुसे यांनी केला आहे. कारण इतिहासात तशी नोंदच नाही. छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्याच दरबारातील रंगनाथ स्वामी यांनी पकडून दिल्याचे पुरावे इतिहासात आहेत. ते दाखवणे गरजेचे होते. चुकीचा व खोटा इतिहास नवीन पिढीसमोर नेऊन नेरेटिव्ह सेट केला जातोय की स्वराज्याचे दुश्मन गणोजी शिर्के होते. हे चुकीचे आहे, असे भानसे म्हणाले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!

Latest News

ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली! ना रस्ता, ना पाणी, ना ड्रेनेज सुविधा... वडगाव कोल्हाटीतील महिला आक्रमक, रस्‍त्‍यावरील सांडपाण्याला ‘प्रशासन’ म्हणत वाहिली श्रद्धांजली!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील वडगाव कोल्हाटीतील गट नं. ९ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून...
एसटी बसने दागिने घेऊन प्रवास करत असाल तर सतर्क व्हा, चोर महिलांच्या टोळ्या तुमचे दागिने चोरून होतील गायब!, शास्‍त्रीनगरातील महिलेचेही सव्वा लाखाचे दागिने नेले...
सिल्लोडच्या अन्वीत तरुणाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या
आदर्श घोटाळ्यातील संशयित महिला चक्क शिंदे गटात दाखल!  
जाधववाडीत २३ वर्षीय तरुणाची आत्‍महत्‍या, प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल : पोलीस सूत्र
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software