नापिकी, कर्जबाजारीपणामुळे विहामांडव्याच्या शेतकऱ्याची आत्‍महत्‍या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विहामांडवा (ता. पैठण) येथील ५८ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी (१२ जानेवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास समोर आली. कचरू भगवान शिंदे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

कचरू शिंदे यांच्याकडे साडेचार एकर शेती होती. मात्र अतिवृष्टी आणि सततच्या नापिकीमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले होते. कर्ज फेडण्याची आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता त्यांना सतावत होती. याच नैराश्यातून त्यांनी घरातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी पाईपला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी कचरू यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पाचोड पोलिसांनी घटनास्‍थळी भेट देऊन पंचनामा केला. आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. कचरू शिंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software