- News
- जिल्हा न्यूज
- सिल्लोडजवळ भीषण अपघात : भरधाव हायवाची पिकअपला जोरात धडक, दोन तरुणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी
सिल्लोडजवळ भीषण अपघात : भरधाव हायवाची पिकअपला जोरात धडक, दोन तरुणांचा मृत्यू, १ गंभीर जखमी
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : भरधाव हायवाने समोरून पिकअप वाहनाला जोरात धडक दिली. यात पिकअपमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना सिल्लोड-भोकरदन रस्त्यावरील पिंपरी फाट्यावर शनिवारी (११ ऑक्टोबर) रात्री ११ च्या सुमारास घडली. विवेक रेवनाथ जेठे (वय २८, रा. टाकळी म्हसला, ता. सिल्लोड) व योगेश गजानन सोनवणे (वय २८, रा. जळगाव सपकाळ, ता. भोकदरन, जि. जालना) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पवन गायकवाड (वय २७, रा. सराटी, ता. फुलंब्री) हा गंभीर जखमी आहे.
पैठण-शहागड रस्त्यावरील मायगाव फाट्यावर रविवारी (१२ ऑक्टोबर) स्कुटी व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात स्कुटीस्वार प्रशांत तुकाराम फुलारे (वय २९, रा. अहिल्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील समद उमराव पठाण (वय ५५) व हसनेन अमीर पठाण (वय ५, दोघे रा. घारी, ता. पैठण) गंभीर जखमी झाले आहेत. ते कुरणपिंपरी येथील पाहुण्यांकडील कौटुंबिक कार्यक्रम आटोपून गावाकडे परतत होते. त्याचवेळी बोरगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथून स्कुटीने फुलारे पैठणकडे येत होते. जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवले आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 22:35:08
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...

