दोन अपघातांत वैजापूरमध्ये दोघांचा मृत्यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : वैजापूर शहराजवळ दोन अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. या घटना गुरुवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास घडल्या. सुरेश सोपान बंगाळे (वय ४०, रा. तिडी, ता. वैजापूर) व जब्बर सोळंकी (वय ३८, रा. डालकी, जि. खरगोन, मध्यप्रदेश) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

तिडी (ता. वैजापूर) येथील सुरेश बंगाळे बांधकाम मजूर होते. ते वैजापूर येथील काम आटोपून नागपूर-मुंबई महामार्गाने तिडीला निघाले होते. सायंकाळी ७ ला शहराजवळील एका पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव आयशर ट्रकने जोरात धडक दिली. नागरिकांनी बंगाळे यांना उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बंगाळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत दुचाकी ट्रकला मागून धडकून जब्बर सोळंकी या कामगाराचा मृत्यू झाला. वैजापूर शहरातील वैजापूर-येवला महामार्गावर विनायकराव पाटील महाविद्यालयाजवळ हा अपघात घडला. सोळंकी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software