म्हणे, वैचारिक मतभेद... लेकीने शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सोयगाव (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी आज, २१ जानेवारीला पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या कन्या मोनाली अनिल पवार यांनी शिंदे गटाकडून आमखेडा गटासाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर कौटुंबिक अडचण होत असल्याचे पाहून राठोड यांनी पक्षनिष्ठा बाजूला ठेवली. नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राजेंद्र राठोड शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्‍त करत ठाकरे गटाने सोयगाव, सिल्लोड आणि कन्नड या तीन तालुक्यांची जबाबदारी सोपवली होती. मुलीने शिंदे गटाची उमेदवारी स्वीकारल्याने राठोड यांनी  दुपारी १ वाजता आ. अंबादास दानवे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. "ज्या पक्षाचा मी जिल्हाप्रमुख आहे, त्याच पक्षाच्या विरोधात माझ्या मुलीने उमेदवारी अर्ज भरल्याने मी या पदावर राहणे योग्य नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

पक्षनिष्ठा कुठे?
अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे नेत्‍यांच्या मुलगा किंवा मुलीने वेगळी वाट निवडली, तेव्हा नेत्यांनी पक्ष प्रथम अशी भूमिका घेत पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली. राठोड यांनी लगेचच मशाल खाली ठेवून दिल्याने इतक्या वर्षांची पक्षनिष्ठा कुठे गेली, असा प्रश्न चर्चेत आला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे सिल्लोड, सोयगाव, कन्नड तालुक्यात ठाकरे गटाचे नुकसान होईल की ठाकरे गटाचे कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागतील, याबाबत चर्चा घडताना दिसत आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...

Latest News

रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले... रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
https://www.instagram.com/reel/DVqQgyaDV0t/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरचा रिलस्टार अरुण तुपे (वय २५, रा. बालाजीनगर) मंगळवारी (१० मार्च) नेहमीप्रमाणे...
तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software