१७ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप, खुलताबाद येथील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रात्री वीटभट्टीजवळ झोपलेल्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना खुलताबादजवळील सुलीभंजन परिसरात शनिवारी (१० जानेवारी) पहाटे समोर आली. दीपक देवसिंग मानघरे (वय १७, रा. सुलीभंजन) असे त्याचे नाव आहे. दीपकचा घातपात झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. खुलताबाद पोलीस सर्वबाजूंनी तपास करत आहेत.

सुलीभंजन परिसरातील दोन वेगवेगळ्या वीट भट्ट्यांवर दीपक व त्याचा मित्र अमोल कचरू सौदागर (वय २१, रा. कसाबखेडा, ता. खुलताबाद) काम करत होते. दोघेही शुक्रवारी रात्री खुलताबाद येथे जेवण करून रात्री अमोल काम करत असलेल्या वीट भट्टीवर आले. थंडीमुळे वीटभट्टीची ऊब मिळेल, अशी जागा बनवून तिथे झोपले. सकाळी दीपकचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दीपकच्या कुटुंबीयांनी घातपात झाल्याचा आरोप केला आहे. मृतदेहाची उत्तरीय तपासणी छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला. तपास पोलीस अंमलदार किशोर गवळी करीत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!

Latest News

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार! मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील...
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software