दुचाकीला उडवून सुसाट वाहन पसार, पती-पत्‍नीचा जागीच मृत्‍यू, वैजापूर तालुक्यातील भीषण दुर्घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दुचाकीस्वार दाम्पत्याला उडवून सुसाट वाहन पसार झाले. यात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. हा दुर्घटना वैजापूर- गंगापूर रस्त्यावरील चोरवाघलगाव (ता. वैजापूर) शिवारात रविवारी (२ नोव्‍हेंबर) सकाळी ९ च्या सुमारास घडली. अलीमोद्दीन करीमोद्दीन सय्यद (वय ५३) आणि अमिना अलीमोद्दीन सय्यद (वय ४६, रा. भेंडाळा मार्ग, गंगापूर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

अलीमोद्दीन हे पत्नी अमिना यांच्यासह दुचाकीने नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासाठी म्हस्की (ता. वैजापूर) येथे जात होते. चोरवाघलगाव शिवारात अज्ञात सुसाट वाहनाने त्यांना जोरात धडक दिली आणि लगेचच हे वाहन पसार झाले. दाम्‍पत्‍याचा गंभीर जखमी होऊन जागीच  मृत्‍यू झाला. त्यांना नगारिकांनी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. वीरगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या दाम्‍पत्‍याला एक मुलगा, दोन विवाहित मुली आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software