सुसाट कारने आधी दुचाकीला उडवले, नंतर ट्रकला धडकली!; गल्लेबोरगावजवळील भीषण अपघात, २ गंभीर जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सुसाट कारने दुचाकीला उडवल्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कारचालक दारू पिलेला होता, असे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले. हा अपघात सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील गल्लेबोरगावजवळ (ता. खुलताबाद) रविवारी (१८ जानेवारी) रात्री ९:१५ वाजता घडला.

गल्लेबोरगावजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असून, सध्या एकेरी वाहतूक वळविण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून पथदिवेही बंद आहेत. तात्पुरते दुभाजकही टाकलेले नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कार (क्र. एमएच १५ एफएफ ९३४७) छत्रपती संभाजीनगरहून नाशिककडे जात होती. त्याचवेळी दुचाकीने (क्र. एमएच २६ सीएस १८०८) वाल्मीक अशोक गायकवाड (वय ३२), विलास गणेश कुऱ्हाडे (वय ३, दोघे रा. देवळाणा, ता. कन्नड) हे देवळाणा (ता. कन्नड) येथे जात होते.

कारने दुचाकीला मागून जोरात धडक दिली.  त्यानंतर कार कन्नडकडून वेरूळकडे येणाऱ्या आयशर ट्रकला क्र. जीजे २३ एडब्ल्यू ४१०४) जोऊन धडकली. यात दुचाकीवरील वाल्मीक व विलास गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. खुलताबाद पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले. अपघातात दुचाकीचा चक्काचूर, तर कारचेही मोठे नुकसान झाले. आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन थांबला. अपघातानंतर वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software