लग्न ठरलेल्या २४ वर्षीय तरुणीची आत्महत्या!; फुलंब्री तालुक्यातील धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : २४ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील रिधोरा येथे शुक्रवारी (९ जानेवारी) दुपारी २ वाजता समोर आली. ज्योती ऊर्फ रुपाली भाकचंद बडुगे (वय २४) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.

बडुगे कुटुंबीय सकाळी दहाला शेतात गेले होते. घरात कोणी नसताना ज्योतीने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. दुपारी तिचा भाऊ घरी आल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याने त्याने आवाज दिले. मात्र बराच वेळ होऊनही ती दरवाजा उघडत नसल्याने त्याने कुटुंबीयांना बोलावले. दरवाजा तोडल्यानंतर ज्योती फासावर लटकलेली आढळली. माहिती मिळताच वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्योतीचे लग्न ठरले होते. तिने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!

Latest News

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार! मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील...
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software