ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न, पण वाचवू शकले नाहीत १७ वर्षांची वैष्णवी!; पुराच्या पाण्यामुळे रुग्णालयात नेण्यास विलंब..., वैजापूरच्या शिऊरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ताप आणि डोकेदुखी वाढून प्रकृती बिघडलेल्या १७ वर्षीय तरुणीला पुरामुळे वेळेत रुग्णालयात नेता आले नाही. त्‍यामुळे तिचा मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (२७ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर अडीचच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे घडली.

वैष्णवी योगेश जाधव (वय १७, रा. शिऊर) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. वैष्णवीच्या आजोबाचे १० दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्‍यामुळे घरात दुःखाचे वातावरण होते. त्यानंतर आता वैष्णवीच्या मृत्‍यूमुळे कुटुंबाचा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. योगेश वसंतराव जाधव यांची मुलगी वैष्णवीची शनिवारी मध्यरात्रीनंतर एकला प्रकृती बिघडली. तिला ताप आणि डोकेदुखी तीव्रतेने सुरू झाली.

मुसळधार पाऊस सुरू होता. कुटुंबीयांनी तिला शिऊर बंगला येथील खासगी रुग्णालयात नेण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र ओढ्याला आलेल्या पुरामुळे ट्रॅक्टर पुढे नेणे अशक्य होते. पण तरीही चालकाने धाडस केले. यात ट्रॅक्टरही वाहून जाऊ लागले, मात्र ग्रामस्थांनी दोरीच्या साहाय्याने ट्रॅक्टरला ओढ्यापलीकडे पोहोचविले. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावरील रुग्णालयात पोहोचण्यासाठी वैष्णवीला दोन तास लागल्याने वाटेतच तिचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

७ दिवसांत ब्लडशुगर कमी करणाऱ्या ७ गोष्टी! मधुमेह राहील नियंत्रणात

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software