‘सख्खा भाऊ, पक्का वैरी...’ रात्रीतून भावाचे घर जाळले, संसाराची केली राखरांगोळी!, पैठण तालुक्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सख्खा भाऊ, पक्का वैरी... अशी एक म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय पैठण तालुक्यातील बन्नीतांडा येथे घडलेल्या घटनेने सर्वांना आला आहे. वहिणी आणि भावाला त्रास देण्यात कोणतीही कसर न सोडणाऱ्या भावाने कुटुंबासोबत मिळून मध्यरात्रीतूनच त्याचे घर जाळून टाकले. यात संसारोपयोगी वस्तू खाक झाल्या आहेत. घराचेही मोठे नुकसान झाले. बिडकीन पोलिसांनी या विकृत भावासह त्याच्या कुटुंबाविरुद्ध शुक्रवारी (७ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

शारदाबाई रमेश जाधव (वय ३२, रा. बन्नीतांडा, ता. पैठण) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पती व मुलाबाळसह राहतात. त्यांच्या पतीला ३ भाऊ असून, संदीप जाधव, अर्जुन जाधव हयात आहेत, तर मंगळ जाधव यांचा मृत्यू झालेला आहे. बऱ्याच दिवसांपूर्वी रमेश आणि त्यांचे दोन्ही भाऊ संदीप व अर्जुन वेगळे राहतात. जमीन व घराच्या विभागण्या झालेल्या आहेत.

सासरे शंकर भाऊलाल जाधव यांचे बऱ्याच दिवसांपूर्वी निधन झाले असून, सासू कोहिनाबाई या वृद्ध असल्याने त्यांचा सांभाळ रमेश व शारदाबाई करतात. त्यामुळे संदीप, अर्जुन व त्यांच्या बायका, मुले कुठल्या ना कुठल्या कारणावरून शारदाबाई व रमेश यांना त्रास देत असतात. त्यांच्या त्रासामुळे शारदाबाई व रमेश हे दीड महिन्यापासून बाहेरगावी राहत आहेत. शारदाबाई व रमेश यांचे घर सिमेंटचे बांधलेले असून चोहीकडून सिमेंटच्या भिंती आहेत. घरच्या वरच्या भागाला पत्रे टाकलेले आहेत. खालच्या भागाला सिमेंटचा गोबा आहे. घरात एकूण ३ रूम आहेत.

बुधवारी काय घडलं? 
बुधवारी (५ नोव्‍हेंबर) मध्यरात्रीतून करण अर्जुन जाधव, रेणुकाबाई अर्जुन जाधव, अर्जुन शंकराव जाधव (सर्व रा. बन्नीतांडा) यांनी कट कारस्थान रचून शारदाबाई व रमेश यांच्या घराच्या खिडकीच्या गजामधून हात टाकून घरात पेट्रोल ओतून देत आग लावून दिली. यावेळी शारदाबाई व रमेश हे घरी नसल्याने वाचले. मात्र घरातील फ्रिज, मिक्सर, पाण्याची टाकी, लसणाच्या जुड्या, कपडे असे एकूण १२ हजार ३०० रुपयांचे नुकसान केले. शारदाबाई यांच्या तक्रारीवरून बिडकीन पोलिसांनी करण अर्जुन जाधव, रेणुकाबाई अर्जुन जाधव, अर्जुन शंकर जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नीलेश शेळके करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software