फुलंब्री पोलिसांवर गोरक्षकांचा गंभीर आरोप : गोवंशांची हत्या करणाऱ्यांना पोलिसांचे पाठबळ?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गोरक्षकांनी फुलंब्री पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांना त्यांनी यासंदर्भात निवेदन दिले असून, त्यात गोवंशांची हत्या करणाऱ्यांना फुलंब्री पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याचे म्हटले आहे.

एकीकडे सरकारने राज्यमाता-गोमाता, असे घोषित केले असले तरी, याच गायींची सर्रास कत्तल होत असताना पोलिसांनी कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचे गोरक्षकांनी दिलेल्या व्हिडीओद्वारे समोर येत आहे. कत्तल होण्याआधी पोलिसांना माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. उलट गोरक्षकांना दमदाटी केली. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे देशी गायींची कत्तल झाली, असे गोरक्षकांनी म्हटले आहे. गोरक्षकांना मारहाण करण्याचे षड्‌यंत्रही कत्तल करणाऱ्यांनी श्यामवाडी या ठिकाणी रचले होते. गोरक्षकांनी पोलिसांना मदत मागितली तरी मिळाली नाही. त्यामुळे जबाबदार पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव

Latest News

वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
वैजापूर (गणेश निंबाळकर : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर पंचायत समिती शिंदे गटाने बिनविरोध ताब्यात घेतली. शिंदे गटाच्या वंदना बाळू...
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
गंगापूर पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे राजेश्वर हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software