- News
- जिल्हा न्यूज
- पैठण हादरले : मस्तवाल अधिकाऱ्यांनी घेतला शेतकऱ्याचा बळी!; रस्तेकामामुळे शेतात पाणी साचत असल्याचे सा...
पैठण हादरले : मस्तवाल अधिकाऱ्यांनी घेतला शेतकऱ्याचा बळी!; रस्तेकामामुळे शेतात पाणी साचत असल्याचे सांगत असलेल्या शेतकऱ्याला धारेवर धरले, उद्विग्न शेतकऱ्याने जवळच्या विहिरीत उडी घेतली!!
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पैठण तालुक्यातील खादगाव येथे अधिकाऱ्यांच्या मस्तवालपणामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेला आहे. खादगाव ते खर्डा रस्ताकामामुळे शेतात पाणी साचल्याची तक्रार शेतकऱ्याने महसूल विभागाकडे केली होती. मंडळ अधिकारी आणि तलाठी पाहणीसाठी आले असता त्यांनी दिलासा देण्याऐवजी शेतकऱ्यालाच मस्तवालपणे बोलायला सुरुवात केली. त्यामुळे उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने त्यांच्यासमोरच थेट विहिरीत उडी घेऊन जलसमाधी घेतली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (१६ सप्टेंबर) दुपारी अडीचला घडली. संजय शेषराव कोहकडे (वय ४५, रा. खादगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
दरम्यान, बालानगर मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे हे दोन्ही अधिकारी वादग्रस्त असून, शेतकऱ्यांची कामे रखडवणे, वारंवार चकरा मारायला लावणे, असभ्य शब्दांत बोलणे यामुळे शेतकरी, ग्रामस्थांत त्यांच्याबद्दल रोष आहे. आताच्या घटनेने त्यांच्या कृत्याने कळस केल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, या घटनेबाबत मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे म्हणाल्या, की तहसील कार्यालयाच्या आदेशावरून मी स्वतः खादगावला गेले होते. तेथे शेतकऱ्यांशी चर्चा करत होते. अचानक संजय कोहकडे यांनी जवळच असलेल्या विहिरीत उडी घेतली. घटनेची माहिती मी स्वतः पैठणच्या तहसीलदार ज्योती पवार व पाचोड पोलिसांना दिली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
विहिरीत पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, पिशोर येथील दुर्दैवी घटना
By City News Desk
Latest News
13 Mar 2026 11:02:27
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या गटाने चक्क भाजपला साथ दिली. ही...

