भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी मनोज मोरेल्लूंनी भरला उमेदवारी अर्ज, सत्तारपुत्राला देणार ‘फाइट’

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

सिल्लोड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोड नगरपालिका निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपमध्येच सरळ लढत होणार असे चित्र आहे. या निवडणुकीत आ. अब्दुल सत्तार हे घराणेशाही चालवत असल्याचा आरोप होत आहे. कारण त्यांनी आपले पूत्र अब्दुल समीर यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी यापूर्वीच पुढे केले आहे. शिवाय भाजपसोबत युती न करण्याचा निर्णयसुद्धा घेतला आहे. आधीच सत्तारांविरोधात राहणाऱ्या भाजपच्या स्‍थानिक पदाधिकाऱ्यांच्या ही बाब पथ्यावर पडली असून, भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी मनोज मोरेल्लू यांनी शुक्रवारी (१४ नोव्‍हेंबर) उमेदवारी अर्जही भरून टाकला. सध्या भाजपची पालिका निवडणुकीची सूत्रे भोकरदनमधून हलत असल्याची चर्चा आहे.

राज्‍यात युती असली तरी सिल्लोड, वैजापूरमध्ये मात्र शिंदे गट-भाजपमध्ये विसंवाद असल्याचे चित्र आहे. या दोन्ही मतदारसंघांत भाजपचे स्थानिक नेते सुरेश बनकर आणि दिनेश परदेशी हे ठाकरे गटात जाऊन शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध विधानसभा निवडणूक लढून पुन्हा आपल्या ताफ्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे वैजापूरमध्ये आ. रमेश बोरनारे हे भाजपचे स्थानिक पदाधिकारी फोडताना दिसत आहेत, तर सिल्लोडमध्ये तर थेटच एकमेकांना आधीपासून विरोध आहे.

भाजपचे माजी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे सध्या सिल्लोड पालिका निवडणुकीची सूत्रे हलवत असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाकडून नगरसेवकपदासाठी कुणाला उमेदवारी द्यायची, याचे निर्णय आ. अब्दुल सत्तार घेत आहेत. या निवडणुकीत भाजप अजित पवार गटाशी युती करेल, अशी शक्यता आहे. पालिकेत १० नगरसेवक असणार आहेत.

पराभवाचा वचपा काढण्याची संधी
सिल्लोड नगरपालिका निवडणुकीत सत्तार यांनी नगराध्यक्षपदासाठी पुत्राचेच नाव जाहीर केल्याने रावसाहेब दानवे यांना जालना लोकसभा मतदारसंघातील पराभवाचा वचपा काढण्याची चांगली संधी चालून आली आहे. सिल्लोड नगरपालिका निवडणुकीत सत्तार यांना अपयश आले तर त्यांचे पक्षातील वजनही कमी होईल. त्यामुळे दानवे कोणत्या प्रकारे व्यूहरचना सिल्लोड पालिका भाजपच्या ताब्यात घेतात, हे पाहणे औत्‍स्‍युक्याचे ठरणार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software