वैजापूरमध्ये SDO डॉ. जऱ्हाड यांना धक्काबुक्की, हातातील कागदे हिसकावली...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सध्या उमेदवारी अर्ज स्वीकारणे सुरू आहे. पंचायत समितीच्या सभागृहात अर्ज स्वीकारत असताना एकाने येऊन गोंधळ घालत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. सोमवारी (१९ जानेवारी) दुपारी ३ ला घडलेल्या या घटनेप्रकरणी वैजापूर पोलिसांनी बाळासाहेब बनसोडे (रा. जामगाव, ता. गंगापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड हे कामकाज करत असताना बाळासाहेब तिथे आला. ‘तुम्ही येथे काहीच व्यवस्था केली नाही,' असे म्हणून धिंगाणा घालायला सुरुवात केली. तो डॉ. जऱ्हाड यांच्या अंगावर धावून गेला. त्यांच्या हातातील नामनिर्देशनपत्रे हिसकावून घेऊन चुरगाळली. धक्काबुक्की करत ‘तुला पाहून घेतो,' अशी धमकीही दिली. बाळासाहेबने रविवारीही तहसीलदार सुनील सावंत यांच्याशी वाद घातला होता, असे समोर येत आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख करत आहेत.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...

Latest News

खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही... खुलताबादमध्ये सत्ता हातून गेल्याने आ. चव्हाणांचा तिळपापड!; भाजप-ठाकरे गटाच्या युतीवर म्हणाले, आम्ही बांगड्या घालून बसलो नाही...
खुलताबाद (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्‍या गटाने चक्‍क भाजपला साथ दिली. ही...
बायको दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून नवऱ्याने घर दिले पेटवून!, सिल्लोडची घटना
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराने पीडितेच्या पतीला कानशिलात वाजवल्याचा आरोप, जोरात फटका बसल्याने जमिनीवर कोसळला... व्हायरल व्हिडीओचे सत्य काय..?
मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software