पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर अघोरी पूजेने खळबळ!; लिंबू, टाचण्या, बाहुली, दोरीगंडा...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर कुणीतरी अघोरी पूजा मांडल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (१८ डिसेंबर) समोर आला आहे. यामुळे उमेदवाराच्या कुटुंबासह नागरिकांत भीती निर्माण झाली. नारळ, हळदकुंकू, लिंबू, टाचण्या, बाहुली, दोरीगंडा ठेवून, सोबत उमेदवार महिला आणि त्यांच्या पतीचा फोटो ठेवलेला होता...

पैठण नगरपालिका निवडणुकीतील ४ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यात २० डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. बुधवारी रात्री कुणीतरी आगळीकच केली. ठाकरे गटाच्या प्रभाग क्र. ३ च्या उमेदवार मंगल कल्याण मगरे यांच्या घरासमोर अज्ञाताने अघोरी पूजा मांडली होती. गुरुवारी सकाळी ही बाब समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याच स्वरुपाची आणखी एक पूजा शहरातील पिठुबरा गल्लीतील पाण्याच्या टाकीजवळही मांडली होती. तिथे तिथेही नारळ, हळदकुंकू, लिंबू, टाचण्या, बाहुली, दोरीगंडा ठेवून ठाकरे गटाच्या २७ उमेदवारांचे छायाचित्र ठेवलेले आढळले. यामुळे नागरिकांत भीतीची लाट पसरली. दरम्यान, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गोर्डे या प्रकाराबद्दल म्हणाले, की हा प्रकार विरोधकांनीच केला असून, ते उमेदवारांना घाबरविण्याचे प्रयत्न करत आहेत. नाथांच्या भूमीत अघोरी प्रकार निवडणुकीच्या काळात पहिल्यांदाच घडला असून, विरोधकांत मशालीची धडकी भरली आहे. पोलिसांनी या प्रकाराचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software