छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसाट वाहने बनली काळ!; तिघांचे बळी घेऊन पसार...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर/छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवाळीनंतर जणू अपघात सत्र सुरू आहेत. गेल्या ५ दिवसांत अपघातांत बळी गेलेल्यांचा आकडा एक डझनवर गेला आहे. रविवारी (२६ ऑक्टोबर) रात्री सुसाट वाहनांनी ३ बळी घेतले. वैजापूर तालुक्यातील घायगाव आणि वाळूज परिसरातील दहेगाव बंगला येथे या घटना घडल्या.

अमोल सुनील गोरे (वय २२) व प्रदीप अशोक काळे (वय २८, दोघे रा. अदिवासी वस्ती, वैजापूर) हे दुचाकीने वैजापूर-गंगापूर रस्त्याने घायगावकडे निघाले होते. घायगाव शिवारात रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला. वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. अपघाताची नोंद वैजापूर पोलिसांनी केली आहे. अशोक काळे यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, एक मुलगी आहे. अमोल गोरे याच्या पश्चात आई-वडील आहेत.

वाळूजजवळ एकाचा मृत्यू
वाळूजजवळील दहेगाव बंगला परिसरात सुसाट वाहनाने दुचाकीस्वार सतीश प्रकाश पल्हारे (३८, रा. कहारवाडा ता. पैठण, ह. मु. साठेनगर, वाळूज) यांना उडवले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. सतीश गंगापूर-छत्रपती संभाजीनगर रस्त्याने जात असताना सुसाट वाहन काळ बनून आले. नागरिकांनी त्यांना घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software