अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, वाढलेले कर्ज, रब्बीच्या पेरणीची चिंता... शेतकऱ्याने मरण कवटाळले!, कन्नड तालुक्यातील हृदयद्रावक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : कन्नड तालुक्यातील शिवराई शिवारात शेतातील झाडाला गळफास घेऊन ६२ वर्षीय शेतकऱ्याने आत्‍महत्‍या केली. ही बाब रविवारी (९ नोव्‍हेंबर) सकाळी १० ला समोर आली. भाऊसाहेब कचरू शिनगारे (वय ६२ वर्षे) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टीमुळे पिके वाया गेल्याने आणि कर्जबाजारीपणा वाढल्याने शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

शिवराई येथील भाऊसाहेब शिनगारे यांच्याकडे तीन एकर शेती असून, शेतीसह मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. गेल्या सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील सर्व पीक वाया गेले. खरिपासाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. हातात पैसे नसल्याने रब्बीच्या पेरणीचीही चिंता होती. याच विवंचनेतून त्यांनी गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी त्यांना हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. भाऊसाहेब शिनगारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...

Latest News

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा... छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
विकास जैन यांनी ACP देशमुख यांचा गळा पकडून मागे ढकलले, बाकीच्यांनी हल्ला केला, म्हणून पोलिसांनी लाठीमार केला!; जैन, राजपूत, जीवनवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालयाच्या मतमोजणी केंद्रावरील दुसरी बाजू आली समोर 
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software