गोदेने पात्र सोडले, पैठणमध्ये पाणी घुसले!; हजारावर रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवले

हर्सूल तलाव तुडूंब; वाळूज एमआयडीसीतील अनेक कंपन्यांत पाणी शिरले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण/छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी गोदावरी नदीपात्रात सोडल्याने महापूर आला. पैठण शहरात तब्‍बल १९ वर्षांनंतर पाणी घुसले आहे. जायकवाडी धरणाच्या सर्व २७ दरवाजांतून टप्प्याटप्प्याने रात्री ११ नंतर ३ लाख सहा हजार क्‍युसेक पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत आहे. पैठण शहरासह आसपासच्या ११ गावांतील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात येत आहे. यापूर्वी २००६ मध्ये अशी परिस्थिती उद्‌भवली होती. अर्धे शहर पाण्याखाली गेले होते.

555664897_1130747029156325_35611 (1)

पैठण शहरातील १ हजार ३०४ रहिवासी व ११ गावांतील ४७९ कुटुंबीयांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षितस्थळी हलवले. दुपारी ३ नंतर पैठणमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेण्यास सुरुवात झाली. व्यापाऱ्यांनी दुकाने रिकामी केली. मदत कार्यासाठी अग्‍निशामक दलाच्या २४ जवांनासह दोन बंब, दोन बोटी, ४० लाइफ जॅकेटसह पोलीस राखीव दल, दंगा काबू पथक, आपात्‍कालीन पथक पैठणमध्ये दाखल झाले आहे.

harsool
हर्सूलचा तलाव तुडूंब भरला आहे.

छत्रपती संभाजीनगरचा हर्सूल तलाव तुडूंब
छत्रपती संभाजीनगर शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे हर्सूल तलाव तुडूंब भरला आहे. यामुळे १४ वॉर्डांचा पाणीप्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे. पूर आल्याने खाम नदीजवळ राहणाऱ्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शहरात ५८ तर जिल्ह्यात ११० मि. मी. पाऊस झाला आहे.

वाळूज एमआयडीसी शहरात शिरले पाणी
अतिवृष्टीमुळे वाळूज एमआयडीसीतील अनेक कंपन्यांत पाणी शिरले. मे मॅट्रिक्स लाइफ सायन्स, हिंदुस्थान कंपोजिट, मीनाक्षी ॲग्रो, महेश इंडस्ट्रीज, राज बोर्डे मील या कंपन्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ए सेक्‍टरमध्ये रस्‍त्‍यालगत खोदलेल्या नाल्यांची कामे अर्धवट सोडलेली असल्याने पाणी रस्‍त्‍यावरून १५ ते २० कंपन्यांत शिरले. रविवारी २५ ते ३० टक्‍के कामगार कामावर आले नव्हते. याचा परिणाम उत्पादनावर झाला. (याआधीची बातमी :  Special Report : जिल्ह्यात मुसळधार! ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी, ३५४ नागरिकांची पुराच्या वेढ्यातून सुटका; प्रशासन सतर्क, मुख्यमंत्री फडणवीस जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात - Chhatrapati Sambhaji Nagar City News )

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software