इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरी स्फोटाने घेतला वृद्धेचा बळी!; उपचारादरम्यान मृत्यू, आडूळमध्ये काय घडलं होतं, ई-दुचाकी चार्ज करताना काय काळजी घ्यावी?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पैठण तालुक्यातील आडूळ येथील बसस्थानक परिसरातील बॅटरीच्या दुकानात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा सोमवारी (३ नोव्‍हेंबर) दुपारी २ च्या सुमारास जबरदस्त स्फोट होऊन शेजारीच बसलेली वृद्ध महिला गंभीररित्या भाजली गेली होती. या वृद्धेचा छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेताना मंगळवारी (४ नोव्हेंबर) मध्यरात्री मृत्यू झाला.

मुक्ताबाई सर्जेराव पिवळ (वय ७४, रा. आडूळ) असे मृत्यू झालेल्य वृद्धेचे नाव आहे. शुभम उत्तमराव पिवळ यांच्या मालकीचे बॅटरी दुरुस्ती व खरेदी-विक्रीचे दुकान असून, त्यांनी इलेक्ट्रिक दुचाकीची (क्र. एमएच ०४ एलएफ ७६१०) बॅटरी काढून दुकानात चार्जिंगला लावली होती. त्यांनी त्यांची चुलती मुक्ताबाई यांना काकू मी जेवण करून येतो, तुम्ही दुकानात बसा, असे सांगितले.

मुक्ताबाई दुकानात बसल्या असता १५ मिनिटांनी चार्जिंगला लावलेल्या बॅटरीचा जोराचा स्फोट झाला. यात मुक्ताबाई गंभीर भाजल्या होत्या. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता, की ग्रामस्थांनी घाबरून दुकानाकडे धाव घेतली.  मुक्ताबाई यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी (५ नोव्‍हेंबर) सकाळी त्यांच्यावर आडूळ गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

ई-दुचाकी चार्ज करताना काय काळजी घ्यावी?
एआयने दिलेल्या माहितीनुसार, ई-दुचाकी चार्ज करताना हवेशीर आणि सुरक्षित ठिकाणी चार्जिंग करावी. उत्पादकाने दिलेला मूळ चार्जर वापरावा. दुचाकी बंद असतानाच चार्जर जोडावा आणि ओव्हरचार्जिंग टाळावी. बॅटरीची काळजी घेण्यासाठी ती सतत १००% किंवा शून्य टक्के ठेवणे टाळावे. ई-दुचाकी ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवावी. धूळ जमा होऊ नये म्हणून चार्जिंग पोर्ट नियमित स्वच्छ करा. प्रथम चार्जर दुचाकीला जोडा आणि नंतर वॉल आउटलेटमध्ये प्लग करा. यामुळे संभाव्य पॉवर सर्ज टाळता येतो. चार्जिंग झाल्यावर आधी वॉल सॉकेटमधून प्लग काढा आणि मग दुचाकीमधून. सतत रात्रभर चार्ज केल्याने बॅटरी खराब होऊ शकते आणि काहीवेळा धोका निर्माण होऊ शकतो. बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर चार्जर अनप्लग करा. बॅटरी पूर्णपणे शून्य टक्के होण्यापूर्वी चार्जिंगला लावा. शक्य असल्यास, थेट स्विचबोर्डमधूनच चार्जिंग करा आणि एक्सटेंशन कॉर्डचा वापर टाळा.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software