झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेतातील झाड तोडत असताना पाय घसरून पडल्याने ३८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भिंगी (ता. वैजापूर) शिवारात शनिवारी (१७ जानेवारी) दुपारी १ च्या सुमारास घडली. अश्पाक इसामू शेख (वय ३८, रा. खंडाळा, ता. वैजापूर) असे मृत्‍यू झालेल्याचे नाव आहे.

अश्पाक हे जगदीश मुंगी याच्या शेतातील झाड तोडत होते. पाय घसरल्याने झाडावरून खाली जोरात पडले. त्याचवेळी तोडलेली झाडाची फांदीही त्यांच्या डोक्यात पडली. ते गंभीर जखमी झाले. सोबतच्या लोकांनी त्यांना वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अश्पाक यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, दोन मुले असा मोठा परिवार आहे. घटनेची नोंद वैजापूर पोलिसांनी घेतली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना

Latest News

प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रिक्षाने सिडको बसस्थानकाकडे येण्यास निघालेल्या विद्यार्थ्याला रिक्षाचालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून लुटले....
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software