रात्री दुकान बंद करून घरी गेले, सकाळी पाहतात तर दुकानावर बोर्ड दुसराच... सिडको कॅनॉट प्लेसमध्ये व्यावसायिकासोबत घडला धक्कादायक प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुकानमालकीच्या वादातून आधीच्या मालकाने भल्या पहाटे येऊन दुकानाचे कुलूप तोडून आपले कुलूप लावले. बोर्डही बदलला. ही बाब समोर आल्यानंतर दुकानाचा ताब असलेल्या मालकाने सिडको पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी (१० जानेवारी) आधीचा मालक आणि त्याच्या पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सिडको एन ५ मधील कॅनॉट प्लेसमध्ये घडला.

सय्यद अमीन हैदर (वय ४५, रा. मुकुंदवाडी, इंदिरानगर), हनिफ हमीद सय्यद (वय ३२) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध संतोष रतनलाल साकला (वय ५४, रा. आयप्पा मंदिराजवळ, सातारा परिसर) यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, साकला यांची कॅनॉट प्लेस टाऊन सेंटर सिडको येथे मोबाइलची दोन दुकाने आहेत. त्यांनी दोन गाळे २०२३ मध्ये ओळखीचे सय्यद आमीन हैदर (रा. मुकुंदवाडी) याच्याकडून विकत घेतले होते. तेव्हापासून ते त्याठिकाणी नवकार टेलीकॉम व अमन मोबाइल अशी दोन दुकाने चालवतात. दोन्ही गाळे विकत घेतल्यानंतर सय्यद अमीन याने दुकानाचा ताबा व दोन्ही दुकानांची कागदपत्रे हस्तांतरीत केली होती.

मात्र दुकान घेतल्यानंतर पाच ते सहा महिन्यांनी जादा रक्कम मागितली. ती रक्कम साकला यांनी दिली नाही. त्यामुळे त्याने गाळे नावावर करून देण्यास टाळाटाळ केली. अखेर साकला यांनी त्याच्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. तो न्यायप्रविष्ठ आहे. त्यानंतर सय्यद अमीन हैदर हा दुकानावर वेळोवेळी येऊन व्यवहाराव्यतिरिक्त जादा रक्कम मागून साकला यांना त्रास देत होता. ३ जानेवारीला संतोष साकला व त्यांचा मुलगा पूर्वेश हे रात्री १० ला दुकानाला लॉक लावून घरी गेले होते. ४ जानेवारीला नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता एका दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले.

दुकानावरील नवकार टेलीकॉमचा फलकही आढळला नाही. त्या जागी अमन मल्टीसर्व्हिसेस असा बोर्ड आढळला. त्यावरून साकला यांनी आजूबाजूला चौकशी केली असता अन्य दुकानदारांनी सकाळी ७ ला दुकानाचे कुलूप सय्यद अमीन हैदर व त्याचा पुतण्या हनीफ हमीद सय्यद यांनी तोडून, दुकानाचा फलक बाजूला काढून त्याच्या नावाचा फलक लावल्याचे सांगितले. दुकानाच्या शटरला असलेले सेंटर लॉक शाबूत आढळले. साकला यांनी सिडको पोलीस ठाण्यात शनिवारी सय्यद अमीर हैदर व हनीफ सय्यद यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दीपक देशमुख करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!

Latest News

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार! मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील...
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software