आ. संजना जाधव यांना कन्नडमध्ये धक्का, शिंदे गटाला अवघ्या ३ जागा, नगराध्यक्षपदाचा उमेदवारही पराभूत

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कन्नडमध्ये आ. संजना जाधव यांना मोठा राजकीय धक्का बसला. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी १८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र त्यांचे केवळ ३ नगरसेवक निवडून आले. या निवडणुकीत अजित पवार गट आणि भाजपने युती केली होती, त्यांचे १५ नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्षपद काँग्रेसकडे गेले असून, फरीन अब्दुल जावेद शेख या ८३५ मतांच्या फरकाने निवडून आल्या. त्यांना १२ हजार ७६१ मते मिळाली. काँग्रेसचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत.

या निवडणुकीत अजित पवार गटाच्या स्वाती संतोष कोल्हे (११ हजार ९०३ मते) या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. भाजपने त्यांना सहकार्य केले नसल्याची चर्चा आहे. शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता कवडे (मते ४१०६) चक्क तिसऱ्या स्थानावर राहिल्या. या निवडणुकीत नवनिर्वाचित नगराध्यक्षा शेख फरीन यांचे पती अब्दुल जावेद हेही निवडून आले असून, शिंदे गटाच्या अनिता कवडे आणि त्यांचे पती काकासाहेब कवडे या दोघांनाही पराभव पाहावा लागला, तर स्वाती कोल्हे आणि त्यांचे पती संतोष कोल्हे यांनाही मतदारांनी नाकारले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी

Latest News

घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यात पुरेसा गॅस उपलब्ध आहे. सध्याच्या गैरफायदा घेण्यासाठी जिल्ह्यात कुणीही गॅसची साठेबाजी करत असेल...
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software