सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गारज (ता. वैजापूर) टोलनाक्याजवळ शनिवारी (१७ जानेवारी) दुपारी १ च्या सुमारास घडला. किर्तीकांत रामचंद्र कुलकर्णी (वय ४५, रा. रोहिता बुद्रूक, जि. नाशिक) असे मृत्‍यू झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे.

कुलकर्णी हे पूजापाठ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शनिवारी ताडपिंपळगाव (ता. वैजापूर) येथे त्यांच्या मामाकडे सत्यनारायणाची पूजा करायला दुचाकीने येत होते. रस्‍त्‍यावरील वाळूवर दुचाकी घसरून गारजच्या टोलनाक्यावर त्यांचा मृत्यू झाला. ते १५ फुटांपर्यंत फरपटत गेले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. जाकीर पठाण यांनी धाव घेऊन त्याला अंगावर पडलेली दुचाकी बाजूला काढत त्यांना शिऊरच्या प्राथमिक रुग्णालयात हलविले. मात्र तोपर्यंत मृत्‍यू झाला होता. शिऊर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

दुसऱ्या अपघातात पैठण- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील धनगावजवळ गुरुवारी (१५ जानेवारी) रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीस्वार विलास भुजंगराव बोडखे (वय ३८, रा. मुधलवाडी, ता. पैठण) यांना उडवले. यात बोडखे यांचा जागीच मृत्‍यू झाला. धडक दिल्यानंतर ते वाहन पसार झाले.  बोडखे यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पैठण एमआयडीसी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software