३५ वर्षीय महिलेवर बलात्कार करून व्हिडीओ केला व्हायरल!; फुलंब्रीची धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

फुलंब्री (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केला. त्याचा व्हिडीओ तयार करून व्हायरल केल्याची धक्कादायक घटना फुलंब्रीत समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मंगळवारी (१४ ऑक्‍टोबर) सायंकाळी या प्रकरणात गुन्हा दाखल करत काहीत तासांतच नराधम अन्वर सय्यदच्या मुसक्या पडेगावमधून आवळल्‍या.

पीडित महिला फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी आहे. गेल्या ३ जुलैला शेतात काम करत असताना तिचे डोके दुखू लागल्याने तिने गावातीलच अन्वर सय्यदला डोकेदुखीची गोळी आणायला कॉल करून सांगितले.  अन्वर गोळी घेऊन शेतात आला. ती गोळी खाल्ल्यानंतर महिलेला चक्कर आली. त्यानंतर अन्वरने तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. या संबंधाचा व्हिडीओही त्याने तयार केला.

मात्र आपलीच बदनामी होईल म्हणून महिलेने याबाबत कुणाला काही सांगितले नाही. मात्र घटनेच्या तीन महिन्यांनी आता अन्वरने विकृतीचा कळस गाठत बलात्‍काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही माहिती महिलेला कळल्याने तिने मंगळवारी सायंकाळी साडेपाचला फुलंब्री पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी अन्वरविरुद्ध गुन्हा दाखल केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री आठला पडेगाव येथून अन्वरच्या मुसक्या आवळल्‍या.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ

Latest News

छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातून ५ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील ३...
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software