३० वर्षीय युवकाने १३ वर्षांची मुलगी, १५ वर्षांच्या मुलाचे केले अपहरण, कारण गुलदस्त्यात!; गंगापूर तालुक्यात खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गावातील ३० वर्षीय युवकाने १३ वर्षांची मुलगी आणि १५ वर्षांच्या मुलाला दुचाकीवर बसवून नेले. त्यानंतर अल्पवयीन मुलगा-मुलगी गायब आहेत. युवकही बेपत्ता आहे. त्याने मुला-मुलीला कुठे नेले, कशासाठी नेले, हे अद्याप समोर न आल्याने गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. गंगापूर पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधकार्य हाती घेतले आहे. ही घटना शनिवारी (८ नोव्‍हेंबर) सकाळी घडली.

गंगापूर तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पतीशी वाद असल्याने माहेरी आई, वडील, भाऊ, भावजयीसह राहतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांची लहानी १३ वर्षांची मुलगी जानवी (नाव बदलले आहे) सातवीत शिकते. त्यांच्या घराशेजारी १५ वर्षांचा मुलगा अमेय (नाव बदलले आहे) त्याच्या आई- वडिलांसह राहतो. शेजारी राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे चांगले संबंध आहेत. अमेय आणि जानवीचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शनिवारी (८ नोव्‍हेंबर) सकाळी पावणेआठला नेहमीप्रमाणे जानवी एसटी बसने शाळेत गेली.

ती शाळेतून दुपारी घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या आईने शाळेतील तिच्या मैत्रिणींना विचारले. त्यावर त्यांनी सांगीतले की, जानवी सकाळी एसटी बसमध्ये शाळेपर्यंत आली. मात्र बसमधून उतरल्यानंतर साडेआठलाच कुठेतरी निघून गेली. शाळेत आली नाही. हे ऐकून घाबरून गेलेल्या तिच्या आईने नातेवाइकांसोबत मिळून तिचा गावात शोध घेतला. तेव्हा अमेयसुद्धा घरी नव्हता. त्याच्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनीही दोघांचा शोध सुरू केला.

जानवीच्या शाळेमधील एका मुलाने सांगितले, की जानवी व अमेय यांना एक मोठा मुलगा त्याच्या मोटारसायकलीवर ट्रिपल सीट बसवून घेऊन जाताना दिसला होता. गावात आणखी विचारपूस केली असता समजले, की गावातीलच आकाश हरिभाऊ पवार (वय ३०, ह. मु. टाकळी ता. राहुरी जि. अहिल्यानगर) हा त्याच्या वडिलांना भेटायला शुक्रवारी संध्याकाळी आला होता. तोही जानवीच्या घराशेजारीच राहत असल्याने त्यानेच जानवी व अमेय यांना अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले, असे तक्रारीत जानवीच्या आईने म्हटले आहे. जानवीने अंगात निळी जिन्स व हिरवा टॉप घातलेला असून, अमेयने पांढरा शर्ट, जिन्स पॅन्ट भुरक्या रंगाची घातलेली आहे. गंगापूर पोलिसांनी आता शोधकार्य हाती घेतले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software