दुरुस्तीचे काम करत असतानाच वीज प्रवाह सुरू, झिरो वायरमनचा खांबावरच मृत्यू, वैजापूरची धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

वैजापूर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर शहरातील सावतानगर परिसरात शुक्रवारी (१६ जानेवारी) दुपारी १ वाजता दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने शॉक लागून २५ वर्षीय झिरो वायरमनचा खांबावरच मृत्यू झाला. सोमनाथ आसाराम पांडागळे (रा. आघूर, ता. वैजापूर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

सोमनाथ दीड-दोन वर्षापासून महावितरणमध्ये झीरो वायरमन म्हणून काम करत होता. घटनेनंतर त्याचे नातेवाइक, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. अभियंते व ठेकेदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत महावितरणविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. उपजिल्हा रुग्णालयासह महावितरणचे कार्यालय आणि पोलीस ठाण्यात जमाव जमला. दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. सोमनाथच्या पश्चात आई आणि एक भाऊ आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software