२२ वर्षीय इरमची आत्‍महत्या, दोन मुलींचे मातृछत्र हरपले, खुलताबादची घटना; पती, सासऱ्याला अटक

On

खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : सासरच्या त्रासाला कंटाळून २२ वर्षीय विवाहिता इरम कामरान शेख हिने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना शुक्रवारी (२५ जुलै) सकाळी आठला खुलताबाद शहरातील राजीव गांधीनगरात समोर आली.

ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून ७ लाख रुपये आण म्‍हणून पती व सासरचे लोक त्रास देत होते. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिसांनी पती शेख कामरान शेख जमील, सासू शहाना बेगम, सासरे शेख जमील शेख चाँद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत पती व सासऱ्याला अटक केली. इरमचे वडील सय्यद मोहीयोद्दीन ईसा मोहियोद्दीन यांनी तक्रारीत म्‍हटले, की इरमचा विवाह कामरानसोबत चार वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. मात्र सासरच्यांकडून तिचा पैशांसाठी छळ सुरू झाला. काही दिवसांपासून कामरानने व्यवसायासाठी ट्रॅक्टर घ्यायचे आहे, त्यासाठी माहेराहून ७ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावला होता. त्‍यासाठी पती, सासू- सासरे सतत छळू लागले. याबाबत इरमने आई-वडिलांना सांगितले होते. छळ असह्य झाल्याने इरमने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास खुलताबाद पोलीस करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आनंदनगरातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण; पालकांनी बसस्थानक, रेल्‍वेस्टेशन, मॉल्स धुंडाळले, अखेर पोलिसांत तक्रार

Latest News

आनंदनगरातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण; पालकांनी बसस्थानक, रेल्‍वेस्टेशन, मॉल्स धुंडाळले, अखेर पोलिसांत तक्रार आनंदनगरातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण; पालकांनी बसस्थानक, रेल्‍वेस्टेशन, मॉल्स धुंडाळले, अखेर पोलिसांत तक्रार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतनगरजवळील आनंदनगरातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. मुलीच्या आईने...
अभिनेत्री आशी सिंहची विशेष मुलाखत; म्‍हणाली, इतरांचे तुटलेले लग्न किंवा नाते पाहून मला भीती वाटते...!
आगीतून फुपाट्यात... दुसऱ्या लग्‍नानंतरही नशिबी तेच भोग, त्‍याची पहिली पत्‍नी परत येण्याची धमकी द्यायची, मामेबहिण करायची मंदिरात लग्‍नाचा दावा!; घटस्‍फोटासाठी तिच्यावर चाकूचे वार!!, सिडको पोलिसांत सांगितली आपबिती
२२ वर्षीय इरमची आत्‍महत्या, दोन मुलींचे मातृछत्र हरपले, खुलताबादची घटना; पती, सासऱ्याला अटक
संतापजनक : छत्रपती संभाजीनगरमध्ये दै. भास्करच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला!; जुगार अड्ड्यावरील छाप्याचे वृत्तसंकलन करताना बेदम मारहाण, मोबाइल हिसकावत हात-पाय तोडण्याची धमकी!!, अवैध व्यावसायिक पँटची चेन उघडून म्‍हणाला, घे आता आमचा फोटो...

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software