- Marathi News
- सिटी क्राईम
- आगीतून फुपाट्यात... दुसऱ्या लग्नानंतरही नशिबी तेच भोग, त्याची पहिली पत्नी परत येण्याची धमकी द्याय...
आगीतून फुपाट्यात... दुसऱ्या लग्नानंतरही नशिबी तेच भोग, त्याची पहिली पत्नी परत येण्याची धमकी द्यायची, मामेबहिण करायची मंदिरात लग्नाचा दावा!; घटस्फोटासाठी तिच्यावर चाकूचे वार!!, सिडको पोलिसांत सांगितली आपबिती

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पहिल्यांदा ठेच लागल्यानंतर दुसऱ्यांदा लग्न करताना खबरदारी घेऊनही विवाहितेच्या नशिबी पुन्हा तेच भोग आले. एक लग्न झालेल्या पुरुषासोबत लग्न केल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांनी त्यानेही छळ सुरू केला. नोकरीही सोडायला लावली, घटस्फोटासाठी दबाव आणू लागला. त्याची पत्नी पहिली परत येण्याची भाषा करत होती, तर मामेबहीण मंदिरात आम्ही लग्न केल्याचा दावा करत होती. त्यामुळे विवाहिता हादरून गेली. घटस्फोट देत नाही म्हणून पतीने तिच्यावर चाकूहल्ला केला. आता तिने सिडको पोलीस ठाणे गाठून पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यावरून गुरुवारी (२४ जुलै) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पतीची पहिली पत्नी अर्चना जाधवसुद्धा कॉल करून म्हणायची, की तू माझ्या मुलीचा सांभाळ व्यवस्थित करत नाही. मला परत घरात यावे लागेल. तुझा पती नेहमी माझ्या संपर्कात राहतो. मला भेटायला बोलावतो, असे अर्चना सांगत होती. तू घर सोडून निघून जा. नसता मी घरी आल्यावर तुझे बरेवाईट करील, अशी धमकी देत होती. त्यानंतर सन २०२२ मध्ये पतीची मामे बहीण निर्मला नाना जाधव हिने प्रतीक्षाला कॉल करून सांगितले, की मी तुझ्या पतीसोबत मंदिरात लग्न केले आहे. तू त्याच्याकडे कसे काय राहते, असे म्हणून तिनेही शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली.
घरातून जात नाही म्हणून जीवघेणा हल्ला
२१ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रतीक्षा यांना पती, सासू व सावत्र मुलगी यांनी घरातून हाकलून दिले. त्या माहेरी छत्रपती संभाजीनगर येथे आल्या असता पतीने फारकतीची नोटीस त्यांना व्हॉटस् ॲपवर पाठविली. त्यामुळे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी त्या सासरी गेल्या. तेव्हा पतीने धमकावले, की तू फारकती दे, नसता तुला जिवंत सोडणार नाही. हाताचापटाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने उजव्या पायाच्या मांडीवर मारून प्रतीक्षा यांना जखमी केले. अधिक तपास पोलीस अंमलदार ज्ञानोबा जोमदे करत आहेत.