संतापजनक : छत्रपती संभाजीनगरमध्ये दै. भास्करच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला!; जुगार अड्ड्यावरील छाप्याचे वृत्तसंकलन करताना बेदम मारहाण, मोबाइल हिसकावत हात-पाय तोडण्याची धमकी!!, अवैध व्यावसायिक पँटची चेन उघडून म्‍हणाला, घे आता आमचा फोटो...

On

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध धंदे व्यावसायिकांचा मस्तवालपणा कसा शिगेला पोहोचला आहे, हे एका घटनेतून समोर आले आहे. दै. भास्कर वृत्तपत्राचे पत्रकार मच्छिंद्र आनंदराव नागरे हे जुगार अड्ड्यावरील पोलिसांच्या छाप्याचे वृत्तसंकलन व छायाचित्रकरण करत असताना अवैध व्यावसायिकांनी त्‍यांच्यावर हल्ला केला. मोबाइल हिसकावत हातपाय तोडण्याची धमकी दिली. क्रांती चौक पोलिसांनी मिल कॉर्नर येथील लकी स्टार हॉटेलचा मालक अफसर खान व त्‍याची दोन्ही मुले आणि ४ अनोळखी व्यक्‍तींविरुद्ध महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्‍ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेने नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ आणि अन्य गंभीर कलमानुंसार गुन्हे दाखल केले आहेत.

मच्छिंद्र नागरे यांनी याप्रकरणात तक्रार दिली. ते म्हाडा कॉलनी सातारा परिसर, देवळाई येथे राहतात. ते दैनिक भास्कर वृत्तपत्रात पत्रकार व छायाचित्रकार म्हणून काम करतात. शुक्रवारी (२५ जुलै) सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास मिलकार्नर येथील लकी स्टार हॉटेल येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. त्या कारवाईचे वार्तांकन करण्यासाठी  नागरे हे खडकेश्वर ते मिलकॉर्नरकडे जाणाऱ्या रोडवरील या हॉटेलसमोर मोबाइलने फोटो व व्हिडीओ बनवत होते. लकी स्टार हॉटेलचे मालक अफसर खान व त्याची दोन्ही मुले आणि ४ ते ५ अनोळखी व्यक्‍ती नागरे यांच्यावर धावून आले.

अफसर खानचा मुलगा म्हणाला, तू कोण आहे? त्‍यावर नागरे यांनी त्‍याला मी पत्रकार आहे, असे सांगून ओळखपत्र दाखविले. त्यावर अफसर खानच्या मुलाने मोबाइल हिसकावून घेत छाप्या संदर्भात केलेले व्हिडीओ व फोटो डिलीट केले. मोबाइलचे नुकसान करून मोबाइल परत दिला. तो म्हणाला, की, तू आम्हाला ओळखत नाही का? आम्ही तुझे हातपाय तोडून टाकू, अशी धमकी देऊन, आमचा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकीक आहे, तुला गायब करून टाकू, तुला मारून टाकू, अशी धमकी देत नागरे यांची शर्टची कॉलर धरून हाताचापटाने मारहाण केली. त्यानंतर अफसर खान याच्या मुलाने त्याच्या पॅन्टची चेन उघडून घे आता आमचा फोटो, असे म्हणून अपमानित केले. त्याच्या सोबतच्या ४ लोकांनी नागरे यांना ओढत हॉटेलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. नागरे यांनी कशीबशी सुटका करून घेतली आणि क्रांती चौक पोलीस ठाणे गाठले. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्‍त संपतराव शिंदे करत आहेत.

छाप्यात पकडले ७५ जुगारी
पोलीस आयुक्‍तालयापासून हाकेच्या अंतरावरील हॉटेल लकी स्टारमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सिटी चौक आणि गुन्हे शाखेच्य पोलिसांनी शुक्रवारी (२५ जुलै) रात्री छापा मारला. या ठिकाणी ७५ हून अधिक जुगारी पकडले. गेल्या काही दिवसांपासून शहर गुन्हे शाखेकडून जुगार अड्ड्यांवर छापेमारी केली जात आहे. अनेक नामांकीत जुगारी समोर यत आहेत. चिश्तिया चौकातील फिजा हॉटेलवरील कारवाईनंतर शुक्रवारी मिल कॉर्नरजवळील खडकेश्वर रोडवरील हॉटेल लकी स्टारवरील जुगार अड्ड्यावर पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी कारवाई केली. कारवाई दरम्‍यान पोलीस कमी अन्‌ जुगारी जास्त असल्याचे दिसल्याने शहर गुन्हे शाखेला मदतीसाठी बोलावण्यात आले. जुगाऱ्यांकडून जप्त केलेल्या मुद्देमालाची मोजदाद सुरू होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आनंदनगरातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण; पालकांनी बसस्थानक, रेल्‍वेस्टेशन, मॉल्स धुंडाळले, अखेर पोलिसांत तक्रार

Latest News

आनंदनगरातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण; पालकांनी बसस्थानक, रेल्‍वेस्टेशन, मॉल्स धुंडाळले, अखेर पोलिसांत तक्रार आनंदनगरातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण; पालकांनी बसस्थानक, रेल्‍वेस्टेशन, मॉल्स धुंडाळले, अखेर पोलिसांत तक्रार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारतनगरजवळील आनंदनगरातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. मुलीच्या आईने...
अभिनेत्री आशी सिंहची विशेष मुलाखत; म्‍हणाली, इतरांचे तुटलेले लग्न किंवा नाते पाहून मला भीती वाटते...!
आगीतून फुपाट्यात... दुसऱ्या लग्‍नानंतरही नशिबी तेच भोग, त्‍याची पहिली पत्‍नी परत येण्याची धमकी द्यायची, मामेबहिण करायची मंदिरात लग्‍नाचा दावा!; घटस्‍फोटासाठी तिच्यावर चाकूचे वार!!, सिडको पोलिसांत सांगितली आपबिती
२२ वर्षीय इरमची आत्‍महत्या, दोन मुलींचे मातृछत्र हरपले, खुलताबादची घटना; पती, सासऱ्याला अटक
संतापजनक : छत्रपती संभाजीनगरमध्ये दै. भास्करच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला!; जुगार अड्ड्यावरील छाप्याचे वृत्तसंकलन करताना बेदम मारहाण, मोबाइल हिसकावत हात-पाय तोडण्याची धमकी!!, अवैध व्यावसायिक पँटची चेन उघडून म्‍हणाला, घे आता आमचा फोटो...

स्पेशल स्टोरी

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software